शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
2
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
3
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
4
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
5
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
6
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या
7
France Gen-Z Protest: फ्रान्समध्ये Gen- Z चा संताप! लिमामध्ये DINA विरोधात बंड, दगडफेक आणि पोलिसांशी झटापट
8
...तर पतीच्या प्रेयसीकडून पत्नीला मिळेल भरपाई; हायकोर्टानं नोंदवली निरीक्षणे
9
आजचे राशीभविष्य- २२ सप्टेंबर २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास! आर्थिक लाभ होणार
10
ट्रम्प हे मित्र की शत्रू..अमेरिकेच्या २ निर्णयांनी भारताला बसला मोठा फटका; पुढे काय करायला हवं?
11
घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी
12
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
13
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
14
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
15
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
16
पाकिस्तानी ‘खेळाडूंना’ जपानमध्ये अटक; परदेशात जाण्यासाठी वापरला वेगळाच अन् अफलातून फंडा
17
राज्य सहकारी बँकेत पती-पत्नीला एकत्र नोकरीला असेल बंदी; विवाहानंतर ६० दिवसांत राजीनामा बंधनकारक
18
जनाब, आपल्या पायाखाली काय जळते ते पाहा...अमेरिकेची चाल, भारताभोवती तयार होतोय धोकादायक त्रिकोण
19
विशिष्ट समुदायासाठी उभारली जाते इमारत; गृहनिर्माण संस्थांना सदस्य निवडीचा अधिकार आहे का?
20
धगधगत्या ज्वालेतून आली जगन्माता, भक्ती दाटते नाव घेता...; कुलस्वामिनीच्या उत्सवाचे विविध रंग

Solapur Politics; सुभाषबापूंशी तासभर गुप्त चर्चा झाल्यानंतर महास्वामींनी शिवायला टाकला भगवा नेहरू शर्ट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 13:54 IST

जगन्नाथ हुक्केरी  सोलापूर : आधी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्याबरोबर चर्चा झाली. संकेत मिळाले  अन् धोरण ठरले. त्यानंतर सहकारमंत्री सुभाष ...

ठळक मुद्देलोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हालचालीहोटगी महाराजांसह अनेक मठाधिपतींची पालकमंत्र्यांसोबत बैठकमुंबई येथे भाजपच्या नेत्याबरोबर झालेला कार्यक्रम हे महास्वामी लोकसभेच्या रिंगणात उतरण्याचे संकेतच

जगन्नाथ हुक्केरी सोलापूर : आधी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्याबरोबर चर्चा झाली. संकेत मिळाले  अन् धोरण ठरले. त्यानंतर सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याबरोबर सोलापूरलोकसभा निवडणुकीबाबत तासभर गुप्त चर्चा झाली अन् गौडगाव मठाचे मठाधिपती शिवाचार्यरत्न डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामींनी तडक मैंदर्गी गाठून सात-आठ भगवे नेहरू शर्ट शिवायला टाकले. 

सोलापूर लोकसभेसाठी खा. अमर साबळे की डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी की पुन्हा विद्यमान खासदार अ‍ॅड. शरद बनसोडे अशी चर्चा सुरू होती.  मात्र वरिष्ठ पातळीवरून चाचपणी झाल्यानंतर स्थानिक नेत्यांवर उमेदवारीचा भार सोडण्यात  आला. 

पालकमंत्र्यांनी महास्वामींशी चर्चा करून उमेदवारीचा तिढा सोडविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पुन्हा सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी महास्वामींशी तासभर चर्चा केली.  या बैठकीतला तपशील समजू शकला नसला तरी जात प्रमाणपत्र, प्रचाराची रणनीती, महाराज मंडळींचे सहकार्य या बाबींची चर्चा झाल्याचे समोर आले आहे. होटगी मठाचे मठाधिश धर्मरत्न डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांच्याशीही महास्वामींजींची सकारात्मक चर्चा झाली आहे.

डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्यांचा सध्या भगवी बंडी आणि त्यावर उपरणे असा पेहराव आहे; मात्र प्रचारात हा पोशाख अडचणीचा ठरणार असल्याने बंडीसारखाच पण फुल बाह्याचा भगवा नेहरू शर्ट मैंदर्गी येथील टेलरकडे शिवायला टाकला आहे. त्यानंतर मैंदर्गीचे मठाधिपती नीलकंठ शिवाचार्य महास्वामी  व नागणसूरचे  मठाधिपत श्रीकंठ शिवाचार्य महास्वामींबरोबर त्यांनी तासभर चर्चा केली. 

असा असणार शर्ट- बंडीसारखीच उंची. पण फुल बाह्याचा भगवा नेहरू शर्ट असणार असून, मनगटाजवळ बाह्यांना गुंड्या नसणार आहेत. पण छातीवर शर्टाला गुंड्या असणार आहेत. अंगात भगवा नेहरू शर्ट असला तरी नेहमीप्रमाणे पंचाची लुंगीच ते परिधान करणार आहेत. नेहरू शर्टवर ते उपरणेही घालणार आहेत. जाकीटचा मोह त्यांना होणार नसल्याचे एका मठाधिपतींनी सांगितले. सहकारमंत्री व पालकमंत्र्यांबरोबर बैठक, जिल्हा व सीमावर्ती भागातील महास्वामींशी, मुख्यमंत्री कार्यालयातून आलेला फोन, मुंबई येथे भाजपच्या नेत्याबरोबर झालेला कार्यक्रम, हे महास्वामी लोकसभेच्या रिंगणात उतरण्याचे संकेतच देत आहे.

पालकमंत्र्यांसोबत बैठक- पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्याबरोबर शेळगी येथील शिवयोगधाम येथे श्री. ष. ब्र. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, मैंदर्गीचे मठाधिपती श्री. ष. ब्र. नीलकंठ शिवाचार्य महास्वामींसह नागणसूरचे मठाधिपती श्री. ष. ब्र. श्रीकंठ शिवाचार्य, मंद्रुपचे श्री. ष. ब्र. रेणुक शिवाचार्य यांची बैठक झाली. यात मठाधिपतींनी सकारात्मक विचार करू,  असे सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरSubhash Deshmukhसुभाष देशमुखlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारण