Solapur Political; शरद पवार-उध्दव ठाकरे यांच्या चर्चेनंतर हाेणार महेश काेठे यांचा पक्ष प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 11:55 AM2021-06-17T11:55:53+5:302021-06-17T11:55:59+5:30

​​​​​​​सुकाणू समिती लवकरच जाहीर हाेणार

Solapur Political; After the discussion between Sharad Pawar and Uddhav Thackeray, Mahesh Kathe will join the party | Solapur Political; शरद पवार-उध्दव ठाकरे यांच्या चर्चेनंतर हाेणार महेश काेठे यांचा पक्ष प्रवेश

Solapur Political; शरद पवार-उध्दव ठाकरे यांच्या चर्चेनंतर हाेणार महेश काेठे यांचा पक्ष प्रवेश

Next

साेलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिका निवडणुकीची जबाबदारी नगरसेवक महेश काेठे यांच्यावर साेपविली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या चर्चेनंतरच पक्ष प्रवेशाचा निर्णय हाेईल, असे काेठे यांनी बुधवारी सांगितले.

काेठे म्हणाले, माझा राष्ट्रवादी प्रवेश स्थगित झाला. काही लाेकांनी मला विराेध असल्याची चर्चा सुरू केली हाेती. या पार्श्वभूमीवर पुण्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बैठक घेतली. या बैठकीला शहरातील आठ पदाधिकारी उपस्थित हाेते. बैठकीला उपस्थित असलेल्या काेणाचा विराेध आहे का? हेसुद्धा पवार यांनी जाणून घेतले. सर्व गाेष्टींवर खुलासा झाला आहे. आता पुढील गाेष्टी पवार यांच्या निर्देशानुसारच ठरणार आहेत.

सुकाणू समिती लवकरच जाहीर हाेणार

महापालिका निवडणूक आणि पक्षाची रणनीती ठरविण्यासाठी एक सुकाणू समिती स्थापन करण्याचे निर्देश प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले आहेत. या समितीमध्ये पक्षाचे शहरातील प्रमुख पदाधिकारी आणि ज्येष्ठ नेत्यांचा समावेश असणार आहे.

 

Web Title: Solapur Political; After the discussion between Sharad Pawar and Uddhav Thackeray, Mahesh Kathe will join the party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app