शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर-उस्मानाबाद राष्ट्रीय महामार्गाचं लोकार्पण; मोदींची राज्याला मोठी भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2019 12:11 IST

सोलापुरात रिमोटची कळ दाबून नरेंद्र मोदींनी केले सोलापूर-उस्मानाबाद राष्ट्रीय महामार्गाचे लोकार्पण केले.

सोलापूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सोलापूरच्या पार्क मैदानावर सभास्थळी आगमन होताच सभा क्षणभराचाही वेळ न दवडता सुरू झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हार, बुके अथवा फुले न देता मोदींच्या हाती थेट शतकापूर्वीची हस्तलिखित भगवत् गीता दिली... खांद्यावर धनगर समाजाचे उपरणे असलेले घोंगडे घातले, डोक्यावर पगडी ठेवली अन् दुस-या हातात म्यान केलेली तलवार दिली... मोदींचं स्वागत झालं.... पंतप्रधानांनी तलवार उंच करून श्रोत्यांना अभिवादन केलं, तेव्हा संपूर्ण स्टेडियम ‘मोदी, मोदी’च्या घोषणांनी दुमदुमून गेलं.

दरम्यान, सोलापुरात रिमोटची कळ दाबून मोदींनी केले सोलापूर-उस्मानाबाद राष्ट्रीय महामार्गाचे लोकार्पण केले. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सोलापुरात उभारत असलेल्या ३० हजार घरांच्या वसाहतीची पायाभरणी आणि अन्य विकास कामांचे उद्घाटन करण्यासाठी मोदी सोलापुरात आले. राज्यपाल विद्यासागर राव यांच्यासह महसूल मंत्री चंद्रकांत पाटील,पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकार मंत्री सुभाष देशमुख मंचावर होते.

मोदींच्या आगमनापूर्वी पार्क परिसरातील विविध चौकांमध्ये आंदोलनेही झाली. धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करू पाहणा-या कार्यकर्त्यांना पोलीसांनी ताब्यात घेतले. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांची धरपकड करण्यात आली. एकीकडे हा माहोल असताना पार्क परिसरात मात्र  उत्साहाला उधाण आले होते. सकाळी ११.०६ वाजता मोदींचे सभास्थळी आगमन होताच संपूर्ण सोलापूर मोदीमय झाले. पार्क मैदानावर चौफेर गर्दी होती. रे नगर वसाहतीचे प्रवर्तक नरसय्या आडम जेव्हा बोलायला उभारले तेव्हा त्यांनी मोदी यांच्यावर स्तूतीसुमने वाहीली...पंतप्रधान मोदीने हम को ऐसा मकान दिया..हम मरेतक नही भुलेंगे...आमची ही भावना आहे, असे सांगताच श्रोत्यांनी जोरदार प्रतिसाद दिला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीSolapurसोलापूर