Solapur: १५ ऑगस्टपूर्वी सांडपाण्याची कामे पूर्ण करण्याचे आदेश, सीईओ स्वामींची अधिकाऱ्यांना तंबी
By शीतलकुमार कांबळे | Updated: July 15, 2023 13:56 IST2023-07-15T13:55:03+5:302023-07-15T13:56:21+5:30
Solapur: येत्या १५ ऑगस्टपर्यंत सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनची कामे पूर्ण करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत.

Solapur: १५ ऑगस्टपूर्वी सांडपाण्याची कामे पूर्ण करण्याचे आदेश, सीईओ स्वामींची अधिकाऱ्यांना तंबी
- शीतलकुमार कांबळे
सोलापूर : येत्या १५ ऑगस्टपर्यंत सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनची कामे पूर्ण करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. वित्त आयोगाचा निधी खर्च करण्याच्या सूचना देत, काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांना स्वामी यांनी तंबी दिली.
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात गटविकास अधिकारी, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता, शाखा अभियंता, विस्तार अधिकारी पंचायत यांची बैठक झाली. या बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव प्रमुख उपस्थित होते.
गटविकास अधिकारी यांच्या स्तरावर फक्त शौषखड्डे बांधायचे आहेत. ही कामे सुरू न झालेमुळे १५ वा वित्त आयोगाचा खर्च कमी झाला आहे. सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची कामे झाली नाहीत. या कामांना १५ वा वित्त आयोगातील ३० टक्के निधी आहे त्यामुळे १५ वा वित्त आयोगाचा देखील खर्च झाला नाही याला कोण जबाबदार आहे ? असा सवाल उपस्थित करून त्यांनी नाराजी व्यक्त केली.