सोलापूर - एमआयएमचे माजी नगरसेवक तौफिक शेख यांच्यासह पाच नगरसेविकांनी शुक्रवारी सायंकाळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. मागील महापालिका निवडणुकीत एमआयएमचे एकूण नऊ नगरसेवक निवडून आले होते. यापैकी तौफिक शेख, वाहिदाबी शेख, पूनम बनसोडे, नूतन गायकवाड, तस्लीम शेख, शाजिया शेख यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. माजी गटनेते रियाज करावी लवकरच प्रवेश करणार आहेत. या कार्यक्रमाला जिल्हा निरीक्षक शेखर माने, शहराध्यक्ष भारत जाधव, प्रदेश सचिव संतोष पवार आदी उपस्थित होते.
Solapur: एमआयएमचा एक नगरसेवक आणि पाच नगरसेविकांचा राष्ट्रवादीत प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2022 20:02 IST