Solapur :ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या शाई फेकणाऱ्या तिघांवर गुन्हा
By रूपेश हेळवे | Updated: November 27, 2022 13:34 IST2022-11-27T13:33:33+5:302022-11-27T13:34:19+5:30
Solapur News:

Solapur :ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या शाई फेकणाऱ्या तिघांवर गुन्हा
- रुपेश हेळवे
सोलापूर : ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर पत्रकार परिषदेत शाई फेकत, मोठ मोठ्याने घोषणाबाजी करणार्या तिघांवर विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत विजापूर नाका पोलिसांनी फिर्याद दिली आहे.
ॲड. सदावर्ते हे शनिवारी दुपारी आसरा चौकातील पंचतारांकित हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेत असताना मराठा आरक्षणाबाबत चुकीचे वक्तव्य केल्याच्या निषेर्धात साेमनाथ राऊतने मोठ्याने घोषणा बाजी करत सोबत आणलेल्या प्लॅस्टिकच्या पिशवीमधील काळ्या रंगाची शाई ॲड. सदावर्ते यांच्यावर टाकून त्यांच्या डोळ्यास इजा पोहचेल असे कृत्य केल्याप्रकरणी सोमनाथ विजय राऊत, कृष्णात गणपत पवार, क्षत्रूग्ण गुरूनाथ माने ( सर्व रा. सोलापूर ) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास मणुरे करत आहेत.