शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
4
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
5
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
6
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
7
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
8
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
9
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
10
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
11
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
12
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
13
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
14
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
15
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
16
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
17
‘निवडणूकपूर्व’साठी राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) अनुत्सुक; निवडणुकीनंतर युती करण्याला मात्र पसंती
18
४८ हजार जणांनी म्हटले, दुबार मतदान करणार नाही
19
‘अमेरिकन ड्रीम’ला H-1B व्हिसाचे नख लागते, तेव्हा...
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर-म्हैसूर व कर्नाटक एक्सप्रेस होणार सुरू; इंटरसिटी, इंद्रायणी अन् सिद्धेश्वरला प्रतीक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 13:24 IST

मध्य रेल्वे; पार्सल, मालवाहतूक, किसान रेल, रो-रो गाड्यांच्या उत्पन्नातच गुंतले रेल्वे प्रशासन

ठळक मुद्देसोलापूर-म्हैसूर ही गाड्या शनिवार १२ सप्टेंबरपासून दर शनिवारी म्हैसूरहून सुटेल तर दर रविवारी ही गाडी सोलापूरहून म्हैसूरकडे रवाना होणारया गाड्यांचे बुकिंग १० सप्टेंबरपासून सुरू होणार आहे़ त्यानुसार मध्य रेल्वेने ठिकठिकाणची रेल्वे आरक्षण केंद्रे सुरू केलीकोरोनामुळे लॉकडाऊन पुकारण्यात आला होता. या काळात रेल्वेने प्रवासी सेवा बंद केली होती

सोलापूर : अनलॉकच्या चौथ्या टप्प्यात राज्य सरकारकडून शिथिलता मिळाल्यानंतर मध्य रेल्वेने विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला़ त्यानुसार येत्या रविवार (दि़ १३) पासून साप्ताहिक सोलापूर-म्हैसूर ही विशेष गाडी सोलापूरहून तर बंगळुरू-नवीदिल्ली (कर्नाटक एक्सप्रेस) या गाड्या धावणार आहेत़ सोलापूरकरांची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाºया इंटरसिटी, इंद्रायणी अन् सिद्धेश्वर एक्सप्रेसला अद्याप हिरवा कंदील मिळाला नाही़ दरम्यान, पुढील टप्प्प्यात रेल्वे मंत्रालयाकडून या गाड्या सुरू करण्यासाठी योग्य तो निर्णय होऊ शकतो, असा विश्वास रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाºयांनी वर्तविला आहे.

कोरोनामुळे लॉकडाऊन पुकारण्यात आला होता. या काळात रेल्वेने प्रवासी सेवा बंद केली होती. सुरुवातीला कोरोना आटोक्यात आल्यानंतर १०० विशेष रेल्वे गाड्या सुरू केल्या होत्या, त्यानंतर अनलॉक ४ मध्ये पुन्हा १०० गाड्या सुरू केल्या़ याशिवाय १२ सप्टेंबरपासून आणखीन ४० गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे़ यात सोलापूर-म्हैसूर ही सोलापुरातून तर बंगळुरू-नवीदिल्ली ही गाडी सोलापूर विभागातून धावणार आहे.

 सोलापूर-म्हैसूर ही गाड्या शनिवार १२ सप्टेंबरपासून दर शनिवारी म्हैसूरहून सुटेल तर दर रविवारी ही गाडी सोलापूरहून म्हैसूरकडे रवाना होणार आहे़ या गाड्यांचे बुकिंग १० सप्टेंबरपासून सुरू होणार आहे़ त्यानुसार मध्य रेल्वेने ठिकठिकाणची रेल्वे आरक्षण केंद्रे सुरू केली़ नोकरदार, विद्यार्थी, प्रशासकीय अधिकारी, कामगार वर्गाच्या लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाºया इंटरसिटी, इंद्रायणी अन् सिद्धेश्वर या गाड्या कधी सुरू होतील, याबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचे सांगितले़ मात्र पुढील टप्प्यात या गाड्या सुरू करण्याबाबत रेल्वे मंत्रालय सकारात्मक निर्णय घेईल, असा विश्वास रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाºयांनी व्यक्त केला़ -------------गृहमंत्रालयाकडे प्रस्ताव सादररेल्वे मंत्रालय लवकरच १०० रेल्वे गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेणार आहे़ त्या संबंधीचा एक प्रस्तावही रेल्वे मंत्रालयाने केंद्रीय गृहमंत्रालयाकडे पाठवत यासाठी परवानगी मागितली आहे. गृहमंत्रालयाकडून हिरवा कंदील दाखवताच अधिकृतपणे या रेल्वे गाड्या सुरू करण्याची घोषणा करण्यात येणार आहे. सध्याच्या घडीला रेल्वे मंत्रालयाकडून जवळपास १२० रेल्वे गाड्या सुरू करण्यासाठीचा प्रस्ताव मंजुरीसाठी गृहमंत्रालयाकडे पाठवण्यात आला आहे. ----------समन्वयानंतरच रेल्वे फेºयांचे नियोजनरेल्वे सेवा काही प्रमाणात पुन्हा सुरू करण्यासाठी रेल्वे विभागातर्फे  राज्याराज्याशी समन्वय साधण्यात येणार आहे. ज्यानंतर कोणत्या शहराला किती रेल्वे फेºयांची आवश्यकता आहे हे निर्धारित करण्यात येईल. याबाबतचा आढावा घेतल्यानंतरच रेल्वे सेवा सुरू करण्यासंबंधीचा निर्णय होईल. येत्या काळात सणासुदीच्या दिवसांचं सत्र सुरू होणार आहे. परिणामी रेल्वे सेवांच्या मागणीत होणारी वाढ पाहता हा मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. आता अनेकांकडूनच ही रेल्वे सेवासुद्धा पुन्हा रुळावर येण्याबाबतची आशा व्यक्त करण्यात येत आहे. सिद्धेश्वर, इंद्रायणी व इंटरसिटी या गाड्या सुरू करण्याबाबतचा अद्याप निर्णय झालेला नाही़ कोणत्या गाड्या सुरू करायच्या, कोणत्या नाही, याबाबत भारतीय रेल्वे मंत्रालय स्तरावर निर्णय घेतला जात आहे़ मात्र पुढील टप्प्यात सोलापूरहून धावणाºया गाड्यांच्या संख्येत वाढ होईल, अशी आशा आहे़ प्रदीप हिरडे,वरिष्ठ वाणिज्य मंडल व्यवस्थापक, सोलापूर विभाग

टॅग्स :Solapurसोलापूरrailwayरेल्वेcentral railwayमध्य रेल्वेKarnatakकर्नाटक