शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

सोलापूर महापालिकेतील टक्केवारीचा वाद चव्हाट्यावर; ‘पैसे पोहोचल्याची’ मनपात चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 10:34 AM

इलेक्ट्रिक बस खरेदी : भाजप नगरसेवकामध्ये वर्चस्वाचा वाद, पदाधिकाºयांच्या डोक्याला ताप

ठळक मुद्देकेंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाच्या योजनेतून सोलापूर मनपाला २५ इलेक्ट्रिक बस मंजूरकेंद्र सरकार महापालिकेला ४० टक्के अनुदान देणार इलेक्ट्रिक बस खरेदी आणि आठ वर्षांच्या देखभाल दुरुस्तीसाठी ३८ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर

सोलापूर : महापालिकेतील ‘मेंबर’ लोकांची टक्केवारी जनतेसाठी नवी नाही. मात्र इलेक्ट्रिक बस खरेदीच्या मुद्यावरून भाजप नगरसेवकांमध्ये सुरू झालेला ‘टक्केवारीचा वाद’ चव्हाट्यावर आला आहे. या वादाला पालिकेतील वर्चस्ववादाची किनार असल्याची चर्चा आहे. 

केंद्र शासनाच्या योजनेतून इलेक्ट्रिक बस मिळविण्यासाठी महापालिकेच्या स्तरावर निविदा प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावर होता. या प्रस्तावाला  मंजुरी मिळावी यासाठी सभागृह नेता श्रीनिवास करली, परिवहन समितीचे सभापती गणेश जाधव, नगरसेवक किरण देशमुख, अविनाश पाटील, अमर पुदाले, विनायक विटकर, शिवानंद पाटील, नागेश भोगडे, कल्पना कारभारी, राजश्री कणके ही मंडळी प्रयत्न करीत होती. या नगरसेवकांनी भाजपमधील इतर नगरसेवकांच्या भेटीगाठी घेऊन योजनेचे महत्त्व पटवून दिले. भाजपचे नगरसेवक सुरेश पाटील, राजेश काळे, नागेश वल्याळ हे या प्रस्तावाच्या विरोधात होते. बस खरेदीतून महापालिकेचे  कसे नुकसान होईल, हे पटवून देत होते. 

यादरम्यान, बस खरेदीत मोठा भ्रष्टाचार होणार आहे. एका मोठ्या कंत्राटदाराला बस पुरवठ्याचे कंत्राट मिळणार आहे. या मक्तेदाराने सभागृह नेता श्रीनिवास करली, परिवहन सभापती गणेश जाधव आणि इतर नगरसेवकांना टक्केवारीचे अ‍ॅडव्हान्स पोहोच केले आहे. सगळे पैसे तेच पळवणार आहेत. 

तुम्हाला काय मिळणार, अशी चर्चा विरोधी गोटातून करण्यात आली. या चर्चेमुळे भाजप नगरसेवकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. अद्याप निविदा तयार झाली नाही तर कोण कशाला पैसे देईल? आमची बदनामी करण्यासाठी हे सगळं होतंय, असे उत्तर पहिल्या गटाचे नगरसेवक देऊ लागले. 

यात किती सत्यता आहे, याबाबतचा उलगडा अखेरपर्यंत झाला नाही. पण त्यातून दोन्ही गटात संतापाचे वातावरण आहे. नगरसेवकांच्या पार्टी मिटिंगमध्ये दोन्ही गटातील आजी-माजी नगरसेवकांनी महिलांसमोर एकमेकांना शिवीगाळ केली. पदावर कोणीही असले तरी भाजपमध्ये आपलीच सत्ता राहावी, यासाठी काही नगरसेवक प्रयत्न करतात. यातूनच हे प्रकार घडत असल्याची चर्चा आहे. 

बस खरेदीवरून दावे-प्रतिदावे- केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाच्या योजनेतून सोलापूर मनपाला २५ इलेक्ट्रिक बस मंजूर झाल्या आहेत. केंद्र सरकार महापालिकेला ४० टक्के अनुदान देणार आहे. इलेक्ट्रिक बस खरेदी आणि आठ वर्षांच्या देखभाल दुरुस्तीसाठी ३८ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर झाला आहे. केंद्र सरकार महापालिकेला ४० टक्क्यांनुसार ११ कोटी रुपये अनुदान देणार आहे. उर्वरित २७ कोटी रुपये महापालिकेने आठ वर्षे हप्त्यांमध्ये भरायचे आहेत. सध्या एक डिझेल बस रस्त्यावर चालविण्यासाठी वाहक, चालकाचा पगार, देखभाल दुरुस्तीसाठी १ लाख १५ हजार रुपये खर्च येतो. इलेक्ट्रिक २५ बसमागे सहा ते सात लाख रुपये वाचणार असल्याचे परिवहन व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. परंतु, उद्या प्रवासी न मिळाल्यास या बसचा तोटा वाढू शकतो. महापालिकेला हा भुर्दंड परवडणार आहे का? परिवहन उपक्रम तोट्यात आहे. त्यात नव्याने तोटा कोण सहन करायचा, असेही भाजपमधील एका गटाचे म्हणणे आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाBJPभाजपाPoliticsराजकारणfraudधोकेबाजी