शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

थकबाकीपोटी सोलापूर महानगरपालिकेने ३६ नळ तोडले, ५ घरे सील, १.३२  कोटींची वसुली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 12:27 IST

मनपाने मिळतकराची थकबाकी वसुलीपोटी उघडलेल्या मोहिमेत रविवारी सुट्टीच्या  दिवशीही सुरू होती. शहर व हद्दवाढ विभागातून दोन दिवसात एक कोटी ३२ लाख ५४ हजार ८६५ रुपये वसुली  करण्यात आली. दरम्यान, मोहिमेत थकबाकीपोटी ३६ जणांचे नळकनेक्शन तोडण्यात आले तर पाच घरे सील करण्यात आली. 

ठळक मुद्देदोन दिवसात एक कोटी ३२ लाख ५४ हजार ८६५ रुपये वसुली शहर हद्दवाढ  भागातून  २१ लाख ६० हजार २४५ रुपये वसुलीशहरी विभागातील १९ जणांचे नळ तोडले तर ३ जणांची मिळकत सील करण्यात आली

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १८ : मनपाने मिळतकराची थकबाकी वसुलीपोटी उघडलेल्या मोहिमेत रविवारी सुट्टीच्या  दिवशीही सुरू होती. शहर व हद्दवाढ विभागातून दोन दिवसात एक कोटी ३२ लाख ५४ हजार ८६५ रुपये वसुली  करण्यात आली. दरम्यान, मोहिमेत थकबाकीपोटी ३६ जणांचे नळ कनेक्शन तोडण्यात आले तर पाच घरे सील करण्यात आली. थकबाकी वसुलीसाठी शहर व हद्दवाढ विभागात ४०० कर्मचाºयांची ५२ पथके फिरत आहेत. शनिवारी  शहरी विभागात ३० लाख २९ हजार २४७ रोख तर १४ लाख ६ हजार २९६ रुपयांचे धनादेश अशी ४४ लाख ३५ हजार ५४३ रुपयांची वसुली झाली. हद्दवाढ विभागात २७ लाख ५७ हजार ४७७ रुपये रोख तर १७ लाख ६९ हजार ९३७ रुपयांचे धनादेश अशी ४५ लाख २७ हजार ४१४ रुपये वसुली झाली. अशाप्रकारे दोन्ही विभागातून ५७ लाख ८६ हजार ७२४ रुपये रोख तर ३१ लाख ७६ हजार २३३ रुपये धनादेशाद्वारे जमा झाले. थकबाकी न भरणाºया शहरी विभागातील १९ जणांचे नळ तोडले तर ३ जणांची मिळकत सील करण्यात आली. हद्दवाढ भागातील पाच जणांचे नळ तोडण्यात आले व दोन मिळकती सील करण्यात आल्या. मोहिमेच्या पहिल्याच दिवशी म्हणजे १५ डिसेंबर रोजी ७८ लाख २९ हजार १८६ रुपयांची करवसुली झाली. यात २५ मिळकतदारांचे नळकनेक्शन तोडण्यात आले तर एक मिळकत सील करण्यात आली. रविवारी सुटीच्या दिवशीही करवसुली मोहीम सुरूच ठेवण्यात आली. रविवारी शहर हद्दवाढ  भागातून  २१ लाख ६० हजार २४५ रुपये वसुली झाली आहे. तर कर आकारणी विभागाने २१ लाख ९४ हजार ६२० रुपये वसुली केली आहे. रविवारी ११२ मिळकतदारांचे नळ सील करण्यात आले. मोठे मिळकतदार टारगेट ठेवून कारवाई सुरूच ठेवली असल्याची माहिती उप आयुक्त त्रिंबक ढेंगळे-पाटील यांनी दिली. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका