साेलापूर महापालिका नाेकर भरतीमधील नियुक्तीपत्रे जूनमध्ये मिळणार

By राकेश कदम | Updated: May 8, 2024 19:54 IST2024-05-08T19:54:12+5:302024-05-08T19:54:25+5:30

प्रशासनाचा दावा : आचारसंहितेमुळे थांबली प्रक्रिया

Solapur municipal servant recruitment appointment letters will be available in June | साेलापूर महापालिका नाेकर भरतीमधील नियुक्तीपत्रे जूनमध्ये मिळणार

साेलापूर महापालिका नाेकर भरतीमधील नियुक्तीपत्रे जूनमध्ये मिळणार

साेलापूर : साेलापूर महापालिकेच्या नाेकर भरतीचा निकाल दाेन महिन्यांपूर्वीच जाहीर झाला. यातील केमिस्ट, फिल्टर इन्स्पेक्टर या पदांवरील तिघांना नियुक्तीपत्रे दिली हाेती. उर्वरित पदांसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना जूनमध्ये नियुक्तीपत्रे मिळतील, असे उपायुक्त आशिष लाेकरे यांनी बुधवारी सांगितले.

महापालिकेने विविध ३१ संवर्गातील ३०२ पदांच्या भरतीसाठी फेब्रुवारी महिन्यात परीक्षा घेतली हाेती. गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. लाेकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आलेली नाहीत. या पदांसाठी पात्र ठरलेले उमेदवार नियुक्तीच्या प्रतिक्षेत आहेत. उपायुक्त लाेकरे म्हणाले, ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन आहे. आचारसंहितेमुळे नियुक्तीपत्रे देण्यात आलेली नाही. सर्व प्रक्रिया जूनमध्ये पूर्ण हाेईल. उमेदवारांना नियुक्तीपत्रे दिली जातील.

या दाेन पदांसाठी घेणार पाेलिसांची मदत
फायरमन, सुरक्षा रक्षक या पदांसाठी शारिरीक क्षमता चाचणी हाेणार आहे. यासाठी पाेलिस आयुक्त, पाेलीस अधीक्षक कार्यालय आणि पाेलिस प्रशिक्षण केंद्र या तिघांकडून सहकार्य मागितले आहे. या तिन्हींपैकी जे कार्यालय सहकार्य करण्यास तयार हाेईल त्यांच्यामार्फत शारिरीक चाचणी परीक्षा पूर्ण हाेईल. जून महिन्यातच पदांवरील पत्र उमेदवारांना नियुक्तीपत्रे दिली जातील.

Web Title: Solapur municipal servant recruitment appointment letters will be available in June