शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

सोलापूर मनपा दवाखाने दुरूस्तीचा खर्च संशयास्पद, राष्ट्रीय नागरी अभियानाचा निधी, ७ दवाखान्यांसाठी केला ४५ लाखांचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 2:22 PM

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (एनयुएचएम) योजनेतून मनपाच्या सात दवाखान्यांच्या दुरुस्तीसाठी ४५ लाखांचा खर्च दाखविण्यात आला आहे. पण प्रत्यक्षात आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी गेल्या आठवड्यात यातील दोन दवाखान्यांना भेटी दिल्यावर घाणीचे साम्राज्य आढळले आहे.

ठळक मुद्देराष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान या योजनेतून २६ मे २0१५ रोजी मनपाच्या हद्दीतील नागरिकांचे आरोग्य सुधारण्यासाठी दवाखाने मजबूत करण्यासाठी ६२ लाख १७ हजारांचा निधी मंजूरनगरसेवक किसन जाधव यांनी पहिल्यांदा रामवाडी दवाखान्याच्या दुरवस्थेबाबत तक्रार केली होतीइतका निधी कोणत्या दुरुस्तीसाठी खर्ची टाकण्यात आला, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २३ : राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (एनयुएचएम) योजनेतून मनपाच्या सात दवाखान्यांच्या दुरुस्तीसाठी ४५ लाखांचा खर्च दाखविण्यात आला आहे. पण प्रत्यक्षात आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी गेल्या आठवड्यात यातील दोन दवाखान्यांना भेटी दिल्यावर घाणीचे साम्राज्य आढळले आहे. त्यामुळे इतक्या खर्चातून कशाची दुरुस्ती करण्यात आली, याबाबत संशय निर्माण झाला आहे. राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान या योजनेतून २६ मे २0१५ रोजी मनपाच्या हद्दीतील नागरिकांचे आरोग्य सुधारण्यासाठी दवाखाने मजबूत करण्यासाठी ६२ लाख १७ हजारांचा निधी मंजूर झाला. यातून शहरातील भावनाऋषी, जिजामाता, रामवाडी, जोडभावी, दाराशा, मजरेवाडी आणि साबळे दवाखाना सुधारण्यासाठी प्रत्येकी दहा लाख खर्चाचा आराखडा करण्यात आला होता. यानंतर या योजनेतून प्रत्येक दवाखान्यासाठी ६ आॅगस्ट २0१५ रोजी विशिष्ट निधी मंजूर करून काम सुरू करण्यात आले. आज मितीस या सात दवाखान्यांची दुरुस्ती पूर्ण झाली असून, एकूण ४५ लाख २३ हजार ८८८ रुपयांचा खर्च दाखविण्यात आला आहे. नगरसेवक किसन जाधव यांनी पहिल्यांदा रामवाडी दवाखान्याच्या दुरवस्थेबाबत तक्रार केली होती. त्यावर आरोग्य सभापती संतोष भोसले यांनी भेट देऊन पाहणी केली होती. त्यानंतर पुन्हा गेल्या आठवड्यात याबाबत आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांच्याकडे तक्रार करण्यात आली. त्याचबरोबर डॉक्टरांच्या मुदतवाढीचा प्रस्ताव सभागृहासमोर आल्यावर अ‍ॅड. यु. एन. बेरिया यांनी दाराशा हॉस्पिटलमधील दुरवस्थेकडे लक्ष वेधले. याबाबत आयुक्तांना पत्र दिल्याचे सांगितले. त्यावर आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी १८ फेब्रुवारी रोजी रामवाडी व दाराशा दवाखान्यांना भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी त्यांना दोन्ही ठिकाणी अत्यंत वाईट अवस्था पाहावयास मिळाली. दरवाजे, खिडक्या, फर्निचर तुटलेले, स्वच्छतागृहाची बिकट अवस्था, पाण्याची गैरसोय, आॅपरेशन थिएटरची दुरवस्था पाहून ते अस्वस्थ झाले. नगर अभियंता लक्ष्मण चलवादी यांना आयुक्त ढाकणे यांनी तातडीने दवाखान्याची दुरवस्था दूर करण्याचे आदेश दिले. त्यामुळे इतका निधी कोणत्या दुरुस्तीसाठी खर्ची टाकण्यात आला, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. -----------------------कार्यकारी समितीमध्ये झाली चर्चा - राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान कार्यकारी समितीची बैठक गुरुवारी आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे, उपआयुक्त त्रिंबक ढेंगळे—पाटील, आरोग्य अधिकारी नवले यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी या योजनेतून झालेल्या कामांवर चर्चा करण्यात आली. दवाखाने दुरुस्तीवर झालेला हा खर्च सांगण्यात आला. त्याचबरोबर या योजनेत चार नवीन आरोग्य केंद्र मंजूर झाले आहेत. त्यासाठी २ कोटी ८0 लाखांचा निधी मंजूर आहे. सोरेगाव, देगाव, मुद्रा सनसिटी येथील केंद्राचे काम पूर्ण झाले आहे. या बांधकामासाठी १ कोटी ७२ लाख खर्च झाले. त्यातील उरलेल्या २४ लाख ७७ हजारांतून फर्निचर करण्याचे ठरले. नई जिंदगी येथील केंद्रासाठी जागा मिळत नसल्याने ७0 लाखांचा निधी परत जाण्याची भीती आहे. त्यामुळे समितीने तातडीने नई जिंदगी येथे जागेची पाहणी करून जागा निश्चित केली. त्याचबरोबर केंद्रासाठी १0६ पदे मंजूर आहेत. ७६ पदे भरली तर ३0 रिक्त आहेत. डाटा एन्ट्रीची १४ व अटेडेटची ११ रिक्त पदे व दोनवेळा जाहिरात देऊनही ४ अर्धवेळ डॉक्टर न मिळाल्याने बीएएमएस डॉक्टर भरण्यास मंजुरी देण्याबाबत आरोग्य उपसंचालकांकडे पाठपुरावा करण्याचे ठरले. ---------------आरोग्य सभापतीपदी निवड झाल्यावर व आयुक्तांबरोबर अशी दोनवेळा रामवाडी दवाखान्यास भेट दिली. दोन्ही वेळा या दवाखान्याची अवस्था दयनीय असल्याचे माझ्या पाहणीत आढळले. दुरुस्तीसाठी ७ लाख ८७ हजार खर्चण्यात आले, यावर माझा विश्वास बसत नाही.- संतोष भोसले, सभापती आरोग्य समिती-------------------दाराशा हॉस्पिटलची आज दुरवस्था आहे. मी याबाबत आयुक्तांना पत्र दिले होते. त्याप्रमाणे त्यांनी स्वत: भेट देऊन पाहणी केली. आॅपरेशन थिएटरला रंगरंगोटी नाही. शौचालय, खाटांची दुरवस्था पाहून त्यांनी मेट्रन, कर्मचाºयांना विनापगारी करण्याचे आदेश दिले आहेत.- अ‍ॅड. यु. एन. बेरिया, नगरसेवक

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका