सोलापूर महानगरपालिका सायबर टेकच्या वादात आॅनलाईन करवसुली बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 11:20 AM2019-03-16T11:20:01+5:302019-03-16T11:21:44+5:30

सोलापूर : भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस) च्या आधारे शहरातील मिळकतींचे सर्वेक्षण करणाºया सायबर टेक कंपनीने कामाचे बिल न मिळाल्याने ...

Solapur municipal corporation cyber-tech deal closed online after tax | सोलापूर महानगरपालिका सायबर टेकच्या वादात आॅनलाईन करवसुली बंद

सोलापूर महानगरपालिका सायबर टेकच्या वादात आॅनलाईन करवसुली बंद

googlenewsNext
ठळक मुद्देबिल थकले : मिळकतदारांना दिल्या जात आहेत हस्तलिखित पावत्यागेल्या आठ वर्षांपासून जीआयएसद्वारे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू सर्वेक्षणाच्या आधारे मिळकत कर आकारणी करण्याचे प्रशासनाचे नियोजन

सोलापूर : भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस) च्या आधारे शहरातील मिळकतींचे सर्वेक्षण करणाºया सायबर टेक कंपनीने कामाचे बिल न मिळाल्याने मिळकत करवसुलीचे आॅनलाईन सर्व्हर ठप्प केले आहे. यामुळे कर संकलन विभागाने आता लिखित स्वरूपात कर भरल्याच्या पावत्या देण्यास सुरुवात केली आहे. मुळातच कंपनीचे काम समाधानकारक नाही. त्यात कंपनीने असाच उशीर लावला तर महापालिका स्वतंत्र प्रणाली उभा करेल, असा इशारा मनपा प्रशासनाने दिला आहे. 

गेल्या आठ वर्षांपासून जीआयएसद्वारे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू आहे. या सर्वेक्षणाच्या आधारे मिळकत कर आकारणी करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. यामुळे मनपाच्या उत्पन्नात भर पडणार आहे. नागरिकांनाही घरबसल्या गुगल मॅपवर आपल्या मिळकतीची माहिती पाहता येणार आहे. हे काम सायबर टेक कंपनीला देण्यात आले आहे. दीड वर्षांपूर्वी हे काम सायबर टेककडून काढून घेण्याचा निर्णय झाला होता. परंतु, तत्कालीन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी या कंपनीकडून काम करून घेण्याचा निर्णय घेतला, पण अद्यापही हे काम पूर्ण झालेले नाही. 

मनपा उपायुक्त त्र्यंबक ढेंगळे-पाटील म्हणाले, सायबर टेक कंपनीला या कामाचे पाच कोटी रुपये देण्याचे ठरले आहे. आजवर अडीच कोटी रुपये देण्यात आले आहेत. आणखी सहा हजार मिळकतींच्या सर्वेक्षणाचे काम बाकी आहे. यादरम्यान कंपनीने २५ लाख रुपये बिल मागितले आहे. प्रशासनाने मिळकतींची छायाचित्रे आणि लाईन डायग्रॅमचे काम पूर्ण करावे, असे कंपनीला सांगितले आहे. पण हे काम केलेले नाही. हे काम पूर्ण करावे आणि त्यानंतरच बिल देऊ, अशी भूमिका प्रशासनाने घेतलेली आहे. जेवढे काम पूर्ण झाले आहे तेवढे पैसे कंपनीला देण्यात आलेले आहेत. 

तर मनपाचे अडीच कोटी वाचतील
- जीआयएस सर्वेक्षणाचा संपूर्ण डाटा महापालिकेकडे आहे. सायबर टेक कंपनीने अर्धवट काम सोडले तर त्यांना अडीच कोटी रुपये देण्याचा प्रश्न नाही. मनपाचे अडीच कोटी रुपये वाचतील. आम्ही सर्वेक्षणाचे काम पूर्ण करून घेऊ. कारण हे काम पूर्ण झाल्यास शहरातील हजारो मिळकतदारांचा फायदा होणार आहे. सध्या कर भरल्यानंतर पावत्या आणि सवलतींबाबचा निर्णय हस्तलिखित नोंदीच्या आधारेच घेतला जात आहे, असेही ढेंगळे-पाटील यांनी सांगितले. 

नागरिकांची अडचण काय ?
- सायबर टेकने सर्व्हर डाऊन केल्यामुळे नागरिकांना आता थेट कर संकलन विभागात जाऊन पैसे भरावे लागत आहेत. मिळकतकराचे डिजिटल पेमेंट केल्यास सवलत मिळते. सर्व्हर डाऊन असल्याने मनपाच्या वेबसाईटवर आॅनलाईन पेमेंट गेटवे उपलब्ध होत नाही. 

Web Title: Solapur municipal corporation cyber-tech deal closed online after tax

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.