सोलापूर मनपा आयुक्तांचा दणका; पेंटर, आकुलवार यांची झोन कार्यालयात बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 13:26 IST2021-02-17T13:26:15+5:302021-02-17T13:26:47+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकींग

सोलापूर मनपा आयुक्तांचा दणका; पेंटर, आकुलवार यांची झोन कार्यालयात बदली
सोलापूर - सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी मंगळवारी रात्री आणखी एक दणका दिला आहे. भूमी व मालमत्ता विभागाच्या अधीक्षका सारीका आकुलवार व बांधकाम विभागाचे प्रमुख रामचंद्र पेंटर यांची झोन कार्यालयात बदली केली आहे. याशिवाय अन्य अधिकारयांच्याही बदल्या आयुक्तांनी केल्या आहेत.
सोलापूर महानगरपालिकेेच्या आयुक्तांनी दोन महिन्यांपुर्वी आवेक्षकांच्या बदल्या केल्या होत्या, मात्र पेंटर व आकुलवार या दोन अधिकार्यांना बदलले नव्हते. त्यामुळे नगरसेवकांकडे नाराजी व्यक्त होत होती. झोन कार्यालयात लॅप राईटर, चावीवाले, सफाई कामगारांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे प्रभागातील कामे होत नसल्याची नगरसेवकांची ओरड होती. सत्ताधारी नगरसेवकांनी झोन क्रमांक ३ मध्ये ठिय्या मारला होता, याची दखल घेत आयुक्तांनी या दोघांसह इतर अधिकार्यांची बदल्या केल्या आहेत. सहाय्यक अभियंता आर. टी. पेंटर यांची विभागीय कार्यालय ८ येथे विभागीय अधिकारी व सारीका आकुलवार यांची विभागीय कार्यालय क्रमांक ७ येथील विभागीय अधिकारी पदावर नियुक्ती केली आहे. याशिवाय आवेक्षक नितीन चौधरी यांची विभागीय कार्यलय १, कालीदास जाधव यांची विभागीय कार्यालय क्रमांक ८, श्रीनिवास जगताप यांची विभागीय कार्यालय ४ व चेतन परचंडे यांची विभागीय कार्यलय ४ येथे बदली केली आहे.