सोलापूर महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर यांची नागपूरला बदली
By Appasaheb.patil | Updated: November 17, 2022 18:11 IST2022-11-17T18:10:32+5:302022-11-17T18:11:47+5:30
महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी सोलापूर शहरात स्मार्ट सिटीच्या माध्यमातून सोलापूरचा चेहरा मोहरा बदलला होता

सोलापूर महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर यांची नागपूरला बदली
सोलापूर - सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त की शिवशंकर यांची नागपूर येथे बदली झाल्याचा आदेश गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास प्राप्त झाला.
शासनाच्या आदेशात म्हटले आहे की, सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर तुमची शासनाने बदली केली असून, आपली नियुक्ती संचालक, वस्त्रोद्योग, नागपूर या पदावर शितल तेली-उगले, भाप्रसे यांच्या जागी ते पद कनिष्ठ प्रशासकीय श्रेणीत अवनत करून केली आहे. तरी, आपण आपल्या सध्याच्या पदाचा कार्यभार प्रधान सचिव (२), नगर विकास विभाग यांच्या सल्ल्याने अन्य अधिका-याकडे सोपवून, नवीन पदाचा कार्यभार त्वरीत स्वीकारावा असा आदेशात उल्लेख करण्यात आला आहे.
दरम्यान, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी सोलापूर शहरात स्मार्ट सिटीच्या माध्यमातून सोलापूरचा चेहरा मोहरा बदलला होता, शिवाय अन्य विकास कामे प्राधान्याने करून नागरिकांची मने जिंकली होती.