शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
2
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
3
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
4
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
5
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
6
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
7
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
8
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
9
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
10
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
11
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
12
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
13
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
14
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
15
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
16
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
17
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
18
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
19
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
20
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा

सोलापूरातील महापालिका अधिकाºयाने उकळले पाच हजार रुपये, महापौरांसमोरच आले प्रकरण उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 7:56 PM

या प्रकरणाची चौकशी करून अधिकाºयावर कारवाई करण्याचे आदेश महापौरांनी आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांना दिले. 

ठळक मुद्देहापौर बनशेट्टी यांनी बºयाच अधिकाºयांची खरडपट्टी केलीभूमी व मालमत्ता विभागातील अधिकाºयाच्या धाडसाबद्दल महापौरांना आश्चर्य

सोलापूर : फडकुले सभागृहासमोरील रस्त्यालगतच्या जागेत एका महिलेला ज्यूस सेंटर सुरू करण्यासाठी भूमी मालमत्ता विभागातील अधिकाºयाने पाच हजार रुपये उकळल्याचा प्रकार महापौर शोभा बनशेट्टी यांच्यासमोर उघडकीस आला. या प्रकरणाची चौकशी करून अधिकाºयावर कारवाई करण्याचे आदेश महापौरांनी आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांना दिले. 

महापौर शोभा बनशेट्टी यांना भेटण्यासाठी विडी घरकूल येथील महानंदा स्वामी आल्या होत्या. त्यांनी आपल्या हातातील कागद दाखवून अतिक्रमण हटाव विभागाने जप्त केलेली ज्यूस मशीन परत मिळवून देण्याबाबत विनंती केली. महापौर बनशेट्टी यांनी नेमका काय प्रकार घडला आहे, याची खातरजमा केली.

महानंदा स्वामी यांनी दिलेल्या माहितीवरून महापौर अवाक् झाल्या. ई-टॉयलेटशेजारी असलेल्या मोकळ्या जागेत ज्यूस सेंटर सुरू करण्यासाठी भूमी व मालमत्ता विभागातील अधिकारी आबासाहेब चव्हाण यांनी पाच हजार व शंभर रुपयांचा एक कोरा स्टॅँप घेतला. एका हजाराची दंडात्मक पावती करून त्यांना तेथे ज्यूस सेंटर सुरू करण्यास सांगितले. पण २५ आॅगस्ट रोजी अतिक्रमण हटाव पथकाने ज्यूस सेंटरमधील मशीन, इतर साहित्य जप्त केले. याबाबत आवश्यक तो दंड भरण्याची तयारी दाखविली तरी मशीन परत देण्याबाबत टाळाटाळ करण्यात येत असल्याची कैफियत महानंदा स्वामी यांनी मांडली. भूमी व मालमत्ता विभागातील अधिकाºयाच्या धाडसाबद्दल महापौरांना आश्चर्य वाटले. अशाप्रकारे शहरात होत असलेल्या किती अतिक्रमण धारकांकडून पैसे उकळण्यात आले असतील याची चौकशी करावी, असे आदेश त्यांनी दिले. 

महापौरांनी केली अधिकाºयांची खरडपट्टी च्महापौर बनशेट्टी यांनी बºयाच अधिकाºयांची खरडपट्टी केली. जनसंपर्क अधिकारी विजय कांबळे हेही त्यातून सुटले नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्था स्थापना दिनी आयोजित कार्यक्रमात तुम्ही कोठे होता? पुण्यतिथी-जयंती अभिवादन कार्यक्रमाला तुमची हजेरी नसते. कार्यक्रमाचे नियोजन ढिसाळ आहे. पगार तुम्ही घेणार आणि तुमचे काम आम्ही करायचे का?, असा खडा सवालही त्यांनी केला. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका