Vande Bharat Express Solapur: सोलापूर- मुंबई वंदे भारतला गुरुवारी ब्रेक; जाणून घ्या ये-जाचे वेळापत्रक
By बाळकृष्ण दोड्डी | Updated: February 9, 2023 23:10 IST2023-02-09T23:09:46+5:302023-02-09T23:10:07+5:30
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूरसाठी वंदे भारतची सेवा शुक्रवारी, 10 फेब्रुवारीपासून सुर होणार...

Vande Bharat Express Solapur: सोलापूर- मुंबई वंदे भारतला गुरुवारी ब्रेक; जाणून घ्या ये-जाचे वेळापत्रक
सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूरसाठी वंदे भारतची सेवा शुक्रवारी, 10 फेब्रुवारी दुपारी तीनपासून सुरू होणार आहे. सोलापूर ते मुंबईसाठी वंदे भारतची सेवा शनिवार, ११ फेब्रुवारी सकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी सुरू होणार आहे. मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस (क्रमांक २२२२५) ही गाडी बुधवार वगळता रोज संध्याकाळी चार वाजून पाच मिनिटांनी सोलापूरकडे धावणार आहे.
तसेच सोलापूर मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस (क्रमांक २२२२६) ही गाडी गुरुवारी वगळता रोज सकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी मुंबईकडे धावणार आहे. या गाडीला दादर, कल्याण, पुणे आणि कुर्डूवाडीला थांबा असणार आहे. तसेच दोन एसी एक्झिक्युटिव्ह आणि १४ एसी चेअर असणार आहेत.