शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

सोलापूर बाजारभाव; पावसाने ओढ दिल्याने भाज्यांची आवक घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 12:29 IST

दरात वाढ : सफरचंद, केळी आवक वाढली

ठळक मुद्दे साबुदाणा, भगर, चिक्कू, सफरचंद, केळासह उपवासाच्या पदार्थांची मागणी वाढलीदुष्काळी परिस्थितीमुळे भाजीपाला आणि फळांची आवक मोठ्या प्रमाणात घटली

सोलापूर : शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर साबुदाणा, भगर, चिक्कू, सफरचंद, केळासह उपवासाच्या पदार्थांची मागणी वाढली आहे. साबुदाण्याचा दर ^५० ते ७० रुपये किलो आहे तर खजुराचा खजुराचा किलोचा ८० ते ९० रुपयांच्या जवळपास झाला आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे भाजीपाला आणि फळांची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे.

गतवर्षी खजुराचा दर ६० रुपयांपासून ते ६५ रुपये होता. तो यावर्षी ९० ते ९० रुपयांच्या घरात गेला आहे. केळीच्या भावातही २० टक्के भाववाढ झाली आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे भाजीपाल्यांची आवक कमी झाल्याने भाज्यांचे दर सुमारे ३० ते ४० टक्क्यांच्या आसपास वाढले आहेत. 

कोथिंबीर पेंढीचा दर हा २५ ते ३० रुपये असा आहे. बटाटे आणि वांगे या भाज्यांचे दर ४० ते ५० रुपये किलो झाले आहेत. महिन्यापूर्वी हेच दर १० ते २० रुपये किलो होते. नवरात्रोत्सवात फळांना ग्राहकांची जास्त मागणी जास्त होती. गेल्या आठवड्याच्या तुलनेत चिक्कूचा प्रतिकिलो दर ३० ते ४० रुपयांचा दर या आठवड्यात ५० रुपयांच्या घरात गेला आहे. सफरचंदची आवकड वाढल्याने दर ८० ते १०० रुपये प्रतिकिलो, मोसंबीचे ६० रुपये किलो, डाळींब ४० रुपयाला किलो असे भाव आहेत.

कांदा, बटाटा आवक घटली...पावसाने ओढ दिल्याने कांदा, बटाटा, वांग्यांसह पालेभाज्यांची आवड घटली आहे. याचा परिणाम दरांवर झाला आहे. पंधरा दिवसांपूर्वी असलेल्या दरापेक्षा ५० टक्के दर सध्या भाज्यांचे वाढलेले आहेत. विशेषत: कांदा, बटाटा आणि वांगे या तीन भाज्या अधिक महाग झाल्या आहेत.

फुलांचे भावझेंडू - ४०-५० रुपये किलोशेवंती  - १५० रुपये किलोगुलाब - ९० रुपये किलो

नवरात्रोत्सवात भाज्या, फळे आणि फुलांची मोठ्या प्रमाणावर मागणी असते. नेहमी पडणारा परतीचा पाऊस शहर आणि जिल्ह्यात न पडल्यामुळे भाज्या आणि फुलांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. परिणामी या वस्तूंचे दर वाढले आहेत.- श्रीशैल घुली,भाजी आणि फूल विक्रेते.

टॅग्स :SolapurसोलापूरAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीMarketबाजारfruitsफळेagricultureशेतीFarmerशेतकरी