शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दारूमुळं संसार उद्ध्वस्त! नशेत बायकोची हत्या, अटकेच्या भीतीनं स्वत:लाही संपवलं, सोलापुरातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 16:33 IST

सोलापुरात दारुच्या नशेत एका व्यक्तीने पत्नीची हत्या करून स्वत:ही आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली.

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात किरकोळ वादातून दारुड्या पतीने पत्नीची हत्या करून स्वत:ही आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच वैराग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बार्शीतील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. त्यानंतर दोघांवर एकत्रित अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली. 

मिळालेल्या माहितीनुसार, सोनाबाई वसंत पवार असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. वसंतला दारुचे व्यसन होते. त्यामुळे वसंत आणि सोनाबाई यांच्यात नेहमीच वाद होत असे. परंतु, मंगळवारी रात्री दोघांत झालेला वाद हा त्यांच्या आयुष्याला पूर्णविराम लावणारा ठरेल, याची कोणीही कल्पना केली नव्हती. घटनेच्या दिवशी वसंत दारू पिऊन घरी आला आणि किरकोळ कारणांवरून पत्नी सोनाबाई हिच्याशी वाद घालू लागला. हा वाद मिटण्याऐवजी इतका पेटला की, वसंतने सोनाबाईला लाकडी दांडक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी घरात असलेल्या वसंतच्या वडिलांनी दोघांमधील वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. परंतु, वसंतने त्यांनाही मारहाण केली. दोघांना जखमी अवस्थेत जमनीवर पडल्याचे पाहून वसंत घटनास्थळावरून पळून गेला. कालच्या मारहाणीत सोनाबाईचा मृत्यू झाल्याचे समजताच वसंतने दुसऱ्या दिवशी सकाळी घराजवळील एका झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.

वसंतने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांना कळवले. या घटनेत वंसतच्या वडिलांच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वसंतला दोन मुले आहेत. त्याचा एक मुलगा संभाजी पवार हा सोलापूर येथे आपल्या पत्नीसह राहतो. तर, दुसरा मुलगा राम पवार हा आई- वडिलांसह राहत होता. घटनेच्या दिवशी राम हा त्याच्या सासरवाडीला गेला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीसCrime Newsगुन्हेगारी