शहरं
Join us  
Trending Stories
1
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
2
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
3
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
4
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
5
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
6
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
7
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
8
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
9
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
10
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
11
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
12
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
13
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
14
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
15
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
16
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
17
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
18
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
19
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
20
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी

सोलापूर लोकसभा निवडणुक ; स्पर्धेतील उमेदवारांवर बनसोडे यांचा आक्षेप..साबळे हे उपरे; तर महास्वामींचा दाखला बोगस !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 3:52 PM

सोलापूर :  खासदार अ‍ॅड. शरद बनसोडे यांनी भाजपतर्फे चर्चेत असलेल्या संभाव्य उमेदवारांबाबत संशय व्यक्त करून घरचा आहेर दिला आहे. ...

ठळक मुद्देसोलापुरात येऊन केला आरोप: साबळे बाहेरचे असल्यामुळे ते आम्हाला कधी भेटणार ?भाजपमध्ये सोलापूर लोकसभेच्या उमेदवारीवरून आता चांगलीच जुंपली सोलापूर लोकसभेसाठी अमर साबळे व डॉ. शिवाचार्य महास्वामी यांची नावे चर्चेत

सोलापूर :  खासदार अ‍ॅड. शरद बनसोडे यांनी भाजपतर्फे चर्चेत असलेल्या संभाव्य उमेदवारांबाबत संशय व्यक्त करून घरचा आहेर दिला आहे. अमर साबळे हे उपरे आहेत तर गौडगावचे डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांचा बेडा जंगम हा जातीचा दाखला बोगस आहे असा आरोप केला आहे. 

भाजपमध्ये सोलापूर लोकसभेच्या उमेदवारीवरून आता चांगलीच जुंपली आहे. सोलापूर लोकसभेसाठी अमर साबळे व डॉ. शिवाचार्य महास्वामी यांची नावे चर्चेत आहेत. पक्षांतर्गत आपल्या उमेदवारीला होणारा विरोध पाहून खासदार बनसोडे अधिकच संतापले आहेत. बनसोडे यांचा पत्ता कट करण्यासाठी लॉबिंग होत असल्याने आता उमेदवारीसाठी त्यांनीही दंड थोपटल्याचे दिसत आहे. पक्षाने उमेदवारी कोणाला देणार हे अद्याप स्पष्ट केले नसले तरी पुण्याचे खासदार अमर साबळे यांनी सोलापुरात वारंवार हजेरी लावल्यामुळे त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. पण ते उपरे आहेत अशा चर्चा सुरू झाल्यावर स्थानिक उमेदवाराचा शोध सुरू झाला. आता गौडगावचे डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. 

या दोन्ही नावांवर प्रतिक्रिया देताना खासदार शरद बनसोडे म्हणाले, भाजपामध्ये लोकशाही आहे व उमेदवारी मागण्याचा प्रत्येकाला हक्क आहे. साबळे यांच्या बाबतीत मी कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. त्यावर साबळे हे उपरे उमेदवार आहेत. त्यांच्याकडे कामासाठी आम्ही कसे जाणार, ते आम्हाला कधी भेटणार, अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्याचे बनसोडे यांनी स्पष्ट केले आहे. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी हे तर आमचे गुरूवर्य आहेत, त्यांचा मी आदर करतो. पण त्यांच्याजवळ असलेले बेडा जंगम हे सर्टिफिकेट बोगस आहे. त्यामुळे ते भाजपाचे उमेदवार होऊच शकत नाहीत. या दोघांची अशी स्थिती असताना मलाच उमेदवारी मिळणार, असा दावा त्यांनी केला आहे.

मंद्रुपचे सरपंचपद का रद्द- डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांचा दाखला वैध नाही, हे स्पष्ट करण्यासाठी खासदार बनसोडे यांनी मंद्रुपच्या सरपंचाचे उदाहरण दिले आहे. मंद्रुपचे सरपंच हिरेमठ भाजपचेच होते. पण त्यांनी सादर केलेला बेडा जंगम हा जातीचा दाखला जिल्हाधिकाºयांनी नाकारला. हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले. उच्च न्यायालयानेही महाराष्ट्रात बेडा जंगम अस्तित्वात नाही म्हणून हे प्रमाणपत्र नाकारले. त्यामुळे भाजप ही रिस्क पुन्हा घेणार नाही, असे बनसोडे यांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSharad Bansodeशरद बनसोडेElectionनिवडणूकLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकlok sabhaलोकसभा