सोलापूर इनिशिएटिव्ह; कचरा हटव बयेऽऽ कचरा हटव....आपल्या परिसराचा थेट फोटो पाठव !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 12:10 PM2018-12-19T12:10:29+5:302018-12-19T12:11:21+5:30

सोलापूर ‘लोकमत’चा पुढाकार: सार्वजनिक ठिकाणच्या स्वच्छतेसाठी सोलापूरच्या ‘स्त्रीशक्ती’ला आवाहन

Solapur Initiative; Waste delete deleted waste ... Send direct photo of your area! | सोलापूर इनिशिएटिव्ह; कचरा हटव बयेऽऽ कचरा हटव....आपल्या परिसराचा थेट फोटो पाठव !

सोलापूर इनिशिएटिव्ह; कचरा हटव बयेऽऽ कचरा हटव....आपल्या परिसराचा थेट फोटो पाठव !

googlenewsNext
ठळक मुद्देसोलापुरातील स्मार्ट महिलांच्या पुढाकारातून ज्या परिसरात स्वच्छता मोहीम सोलापूरकरांचा अधिकाधिक सहभाग वाढावा आणि सोलापूर शहर स्मार्ट व्हावं, यासाठी लोकमतनं पुढाकार घेतलाय.महिलांनी आपल्या परिसरातील कचºयाची माहिती 9096880008 या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर मेसेजद्वारे पाठवावी.

सोलापूर: आपल्या शहराला ‘स्मार्ट सिटी’ बनवायचं असेल तर अगोदर ‘स्वच्छ सोलापूर’ ही मूलभूत गरज असल्याचं सोलापूरकरांच्या लक्षात आलंय. महापालिकेनं शेकडो घंटागाड्या घरोघरी फिरवण्यास सुरुवात केली असली तरी अजूनही बºयाच ठिकाणी रस्त्यावर कचरा साठलेला दिसतोय. हे लक्षात घेऊन ‘लोकमत’नं आजपासून एका वेगळ्या चळवळीचा शुभारंभ केलाय.. अर्थात ‘स्मार्ट सिटी-स्मार्ट सखी’.

ज्यात आपापल्या परिसरातील सार्वजनिक कचरा कायमचा दूर करण्यासाठी पुढाकार घेतील सोलापूरच्या सुज्ञ भगिनी. 
गेल्या दहा वर्षांत शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढतेय. चारही बाजूने वाढलेल्या या शहरातील कचºयाची मूलभूत समस्या दूर करण्यासाठी महापालिकेची आरोग्य यंत्रणा कार्यरत आहे. मात्र, वर्षांनुवर्षाची सवय लागलेल्या मंडळींकडून रस्त्यावर कचरा टाकणे काही बंद होत नसल्याचे दिसत आहे. ‘स्मार्ट सिटी’ बनवण्यासाठी सर्वप्रथम ‘स्मार्ट सोलापूरकर’ बनणं गरजेचं आहे. हे ओळखूनंच स्मार्ट महिलांच्या पुढाकारातून ‘लोकमत’ने स्वच्छतेची ही मोहीम हाती घेतली आहे. यातून आपले शहर जास्तीत जास्त स्वच्छ राहण्यावर भर दिला जाईल.

स्मार्ट सोलापूरकर हे करतील...

  • ज्या-ज्या ठिकाणी अजूनही रोज कचरा रस्त्यावर पडतो त्या ठिकाणी परिसरातील उत्साही महिला स्वत:हून पुढाकार घेतील.
  • या महिला सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाºयांचे फोटो काढून ‘लोकमत’कडे पाठवतील. 
  • हे फोटो ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर महापालिकेची यंत्रणा संबंधितांवर तत्काळ कारवाई करेल. 
  • यानंतर संबंधित ठिकाणी या महिलांचा चमू जाऊन तेथील नागरिकांमध्ये स्वच्छतेबद्दल प्रबोधन करेल.
  • प्रत्येक घरातील कचरा घंटागाड्यांमध्येच टाकण्याची सवय लावली जाईल. 
  • सातत्यानं फॉलोअप घेऊन ते ठिकाण कायमस्वरूपी स्वच्छ ठेवलं जाईल. 

तुमच्या परिसरात कचरा साठलाय? काढा फोटो अन् 
पाठवा मेसेज!

- सोलापुरातील स्मार्ट महिलांच्या पुढाकारातून ज्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवली जाईल, त्या मोहिमेची सचित्र माहिती ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहे. सोलापूरकरांचा अधिकाधिक सहभाग वाढावा आणि सोलापूर शहर स्मार्ट व्हावं, यासाठी लोकमतनं पुढाकार घेतलाय.. तेव्हा महिलांनी आपल्या परिसरातील कचºयाची माहिती 9096880008 या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर मेसेजद्वारे पाठवावी. चला तर मग.. उचला मोबाईल, काढा फोटो अन् पाठवा मेसेज.

Web Title: Solapur Initiative; Waste delete deleted waste ... Send direct photo of your area!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.