Solapur: पाल पडलेला पातेल्यातील चहा प्यायल्याने तीन मुले उपचारासाठी रुग्णालयात
By विलास जळकोटकर | Updated: October 12, 2023 17:24 IST2023-10-12T17:24:23+5:302023-10-12T17:24:41+5:30
Solapur News: चहा करीत असताना पातेल्यात कोणाच्याही नकळत पाल पडली. त्यातील चहा पिल्यामुळे ताप आलेल्या तीन मुलांना बुधवारी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करावे लागले.

Solapur: पाल पडलेला पातेल्यातील चहा प्यायल्याने तीन मुले उपचारासाठी रुग्णालयात
- विलास जळकोटकर
सोलापूर - चहा करीत असताना पातेल्यात कोणाच्याही नकळत पाल पडली. त्यातील चहा पिल्यामुळे ताप आलेल्या तीन मुलांना बुधवारी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करावे लागले. सकाळी ११ च्या सुमारास स्लॉटर हाउस, बापूजननगर परिसरात ही घटना उघडकीस आली.
यातील मायरा चंद्रकांत विटेवल्लू (वय ५), कार्तिक चंद्रकांत तिघे, रा. स्लॉटर हाउस, बापूजीनगर, सोलापूर) या तिघांनी सकाळी राहत्या घरी पातेल्यातील चहा पिला. पातेले रिकामे झाल्यानंतर त्यात पाल आढळून आली. त्यांना तातडीने खासगी दवाखान्यात नेऊन प्राथमिक उपचार करण्यात आले. यानंतर यातील तीन वर्षांच्या कार्तिकला ताप आल्याने तिघांनाही ब्रदर रवी शिवनूर, डॉ. जयेश यांनी येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिघांवरही उपचार सुरू असून, तिघेही मुले शुद्धीवर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सिव्हिल पोलिस चौकीत या घटनेची नोंद झाली आहे.