Solapur: सर्दी झाल्यानं शेक देताना गरम पाणी अंगावर पडून बाळ भाजलं

By रवींद्र देशमुख | Updated: November 4, 2023 18:27 IST2023-11-04T18:27:31+5:302023-11-04T18:27:59+5:30

Solapur News: दोन वर्षाच्या बाळाला सर्दी-खोकला झाल्यानं त्याला वाफ देत असताना गरम पाणी अंगावर पडून बाळ भाजण्याचा प्रकार मोहोळ तालुक्यातील एकुरके येथे घडला. रुद्र कृष्ण चौगुले (वय- २) असे बाळाचे नाव आहे.

Solapur: Hot water fell on body while giving shake due to cold and baby was burnt | Solapur: सर्दी झाल्यानं शेक देताना गरम पाणी अंगावर पडून बाळ भाजलं

Solapur: सर्दी झाल्यानं शेक देताना गरम पाणी अंगावर पडून बाळ भाजलं

- रवींद्र देशमुख  
सोलापूर - दोन वर्षाच्या बाळाला सर्दी-खोकला झाल्यानं त्याला वाफ देत असताना गरम पाणी अंगावर पडून बाळ भाजण्याचा प्रकार मोहोळ तालुक्यातील एकुरके येथे घडला. रुद्र कृष्ण चौगुले (वय- २) असे बाळाचे नाव आहे.

यातील भाजलेल्या बायाला सर्दी, खोकला झाल्याने त्याच्या छातीमध्ये कफ दाटला होता. त्याच्या नातलगांकडून पातेल्यामध्ये गरम पाणी घेऊं वाफ देत असताना अचानक बाळाचा पाय गरम पाण्याच्या पातेल्याला लागला आणि गरम पाणी त्याच्या हाता-पायावर पडल्याने तो भाजली. त्याला तातडीने खासगी दवाखान्यात प्राथमिक उपचार करण्यात आले. डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याचे काका संदेश यांनी येथील शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरु असून, तो शुद्धीवर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. येथील सिव्हील पोलीस चौकीत या घटनेची नोंद झाली आहे.

Web Title: Solapur: Hot water fell on body while giving shake due to cold and baby was burnt