शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Solapur: २० नोव्हेंबरपासून साेलापूर विद्यापीठाच्या परीक्षा, २५ हजार परीक्षार्थी

By संताजी शिंदे | Updated: November 9, 2023 18:55 IST

Solapur University Exams: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या पदवीच्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांना २० नोव्हेंबर २०२३ पासून सुरुवात होणार आहे. शहर व जिल्ह्यातील ३५ केंद्रांवर परीक्षा होणार असून २५ हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

- संताजी शिंदे सोलापूर - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या पदवीच्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांना २० नोव्हेंबर २०२३ पासून सुरुवात होणार आहे. शहर व जिल्ह्यातील ३५ केंद्रांवर परीक्षा होणार असून २५ हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून या परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे. २० नोव्हेंबर पासून बीए, बीकॉम, बीएससी, बीबीए, बीसीए या पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षांना प्रारंभ होणार आहे. शहर व जिल्ह्यातील विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयाच्या केंद्रावर या परीक्षा होणार आहेत. सुमारे २५ हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. या अभ्यासक्रमांच्या परीक्षेचे वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना हॉल तिकीट देण्याची व्यवस्था ही परीक्षा विभागाकडून करण्यात आली आहे. पदवीच्या परीक्षा पार पडल्यानंतर डिसेंबरमध्ये पदव्युत्तर, इंजिनिअरिंग, व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षांना सुरुवात होईल. त्या अभ्यासक्रमांचे वेळापत्रक विद्यापीठ संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे.

यंदा पदवीच्या प्रथम वर्ष अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे असेसमेंट (उत्तरपत्रिका तपासणी व मार्क अपलोड करणे) महाविद्यालय स्तरावर होणार आहे. मात्र वेळापत्रक जाहीर करणे, प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका विद्यापीठाकडूनच देण्यात येणार आहे. प्रथम वर्ष विद्यार्थ्यांच्या परीक्षा या ज्या-त्या महाविद्यालयातच होणार आहे. उत्तरपत्रिका तपासणी व मार्क विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अपलोड करणे हे महाविद्यालय स्तरावर होणार असल्याने निकाल देखील लवकर जाहीर होणार असल्याचे प्रभारी परीक्षा संचालक डॉ. मलिक रोकडे यांनी सांगितले.

एकूण तीन सत्रामध्ये परीक्षा होतील. याचबरोबर कॉपीसारख्या प्रकारांना आळा घालण्यासाठी भरारी पथकांची देखील विद्यापीठाकडून नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यास करूनच परीक्षेला सामोरे जावे.- प्रा. डॉ. प्रकाश महानवर, कुलगुरू

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur University, Solapurसोलापूर विद्यापीठ, सोलापूरexamपरीक्षा