शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर : पोलीस आणि दरोडेखोरांमध्ये चकमक, पोलिसांच्या गोळीबारात एक दरोडेखोर ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2019 09:33 IST

सोलापूर-तुळजापूर महामार्गावरील उळे गावाजवळ रविवारी (10 फेब्रुवारी) पहाटेच्या सुमारास पकडलेल्या दरोडेखोराला सोडवण्यासाठी बाकीच्या सहकाऱ्यांनी पोलिसांवर तलवारीने तसेच दगडांनी हल्ला केला. तेव्हा स्वरक्षणासाठी पोलीस अधिकाऱ्याने केलेल्या गोळीबारात एक दरोडेखोर ठार झाला.

ठळक मुद्देसोलापुरात पोलीस आणि दरोडेखोरांमध्ये चकमकदरोडेखोरांच्या हल्ल्यात पोलीस निरीक्षक गंभीर जखमीपोलिसांच्या गोळीबारात एक दरोडेखोर ठार

सोलापूर  : सोलापूर-तुळजापूर महामार्गावरील उळे गावाजवळ रविवारी (10 फेब्रुवारी) पहाटेच्या सुमारास पकडलेल्या दरोडेखोराला सोडवण्यासाठी बाकीच्या सहकाऱ्यांनी पोलिसांवर तलवारीने तसेच दगडांनी हल्ला केला. तेव्हा स्वरक्षणासाठी पोलीस अधिकाऱ्याने केलेल्या गोळीबारात एक दरोडेखोर ठार झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास उळे गावाजवळ गस्त घालताना तालुका पोलीस स्टेशनच्या पोलिसांना पाच ते सहा दरोडेखोर दिसले. पोलिसांनी त्यांना हटकले. एकाला पकडून गाडीत घालत असताना तो दरोडेखोर पोलिसांना 'साहेब.. चुकले चुकले,' म्हणत असताना त्याच्यासह  इतर सहकाऱ्यांनी हातातील तलवारीने पोलीस निरीक्षक विजय पाटील यांच्या हातावर आणि मांडीवर तलवारीने हल्ला केला. तसेच दगडफेकही करण्यात आली.

या हल्ल्यात विजय पाटील गंभीर जखमी झाले. तेव्हा पाटील यांनी स्वरक्षणासाठी गोळीबार केला. यात एक दरोडेखोर जखमी झाला. त्याला जखमी अवस्थेत सिव्हिलमध्ये उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत्यू घोषित केले. दरम्यान, या हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत.

दुसरीकडे, घटनास्थळी सकाळी दोन कार आढळल्या असून यातील एका गाडीचा क्रमांक Mh-13 AZ / 1798 असा आहे. एका गाडीच्या काचा फुटलेल्या दिसत आहेत. त्यामुळे या गाड्या पोलिसांच्या आहेत की दरोडेखोरांच्या, याचीही ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. 

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी