शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

सोलापूर जिल्ह्यात फक्त ४० टक्के पाऊस, ४७० गावात टँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 19:23 IST

नोव्हेंबरपर्यंतच चारा शिल्लक, विहिरी, जनावरांच्या गोठ्यांच्या नियोजनाची गरज

ठळक मुद्देपावसाने गुंगारा दिल्याने दुष्काळी स्थितीची तीव्रता वाढलीसरासरीच्या अवघा ४० टक्के पाऊस पडल्याचे हे परिणामदुष्काळाला सामोरे जाण्याची वेळ जिल्ह्यावर आली

अरुण बारसकरसोलापूर:  पाणी पुरवठ्यासाठी गावागावात योजना राबवूनही यावर्षी ४७० हून अधिक म्हणजे अर्ध्या जिल्ह्याला  टँकरने पाणी द्यावे लागणार असल्याचे संभाव्य टंचाई आराखड्यात म्हटले आहे. जिल्ह्यात  लहान-मोठा १७-१८ लाख जनावरांसाठी नोव्हेंबरनंतर चाºयाची उपलब्धता करावी लागणार आहे. सरासरीच्या अवघा ४० टक्के पाऊस पडल्याचे हे परिणाम आॅगस्ट २०१९ पर्यंत दिसणार आहेत.

सोलापूर जिल्ह्यात यावर्षी परतीच्या पावसाने गुंगारा दिल्याने दुष्काळी स्थितीची तीव्रता वाढली आहे. सप्टेंबरनंतर दुष्काळाची जाणीव होवू लागल्याने प्रशासनही त्यादृष्टीने नियोजन करीत आहे. यावर्षी जिल्ह्यात एकूण ५ हजार ३७० मि.मी. इतका पाऊस अपेक्षीत असताना २१८९ मि.मी. इतकाच पाऊस पडला. सरासरी ४८८.८३ मि.मी. पाऊस पडणे अपेक्षीत असताना अवघा १९९ मि.मी. म्हणजे ४०.७१ मि.मी. पाऊस पडला. यामुळेच दुष्काळाला सामोरे जाण्याची वेळ जिल्ह्यावर आली आहे.

जिल्ह्यातील  ग्रामीण भागाच्या नागरिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी १३७६ उपाययोजना कराव्या लागणार  असून त्यासाठी ३० कोटी ८९ लाख रुपये खर्चाचा आराखडा केला आहे. यामध्ये ४७० गावासाठी टँकर गृहीत धरुन २० कोटीचा खर्च होणार आहे. विहीर खोल करणे, नळ योजना तात्पुरती दुरुस्ती व अन्य कामांसाठी ११ कोटी खर्च गृहीत धरला आहे. 

जिल्ह्यात लहान-मोठी १७ ते १८ लाख जनावरे आहेत. या जनावरांसाठी कृषी खात्याने दिलेल्या माहितीनुसार नोव्हेंबरपर्यंत चारा उपलब्ध असून त्यानंतर चाºयाची उपलब्धता करावी लागणार आहे. राज्य शासनाच महत्वाकांशी अहित्यादेवी होळकर विहीर योजना व जनावरांच्या गोट्याच्या निर्मितीसाठी प्रशासनाने नियोजन करणे आवश्यक आहे. 

विहिरींच्या खोदाईमुळे आगामी काळात पडणाºया पावसाचा अल्पभुधारक शेतकºयांना फायदा होईल व जनावरांसाठी गोठेही तयार होतील. गोधन जोसण्यासाठी चारा व पाण्याचा  प्रश्न प्रशासनाच्या पटावर राहणारच आहे सोबत जवाहर विहिरी, गुरांचे गोटे यासारख्या योजनांकडेही लक्ष देण्याची आवश्यकता आहे. 

जलयुक्त शिवार योजनेमुळे स्थिती चांगली !- मागील वर्षीच्या पावसाळ्यात जिल्ह्यात ४०७ मि.मी.  म्हणजे ८३ टक्के पाऊस पडला होता. मागील दोन-तीन वर्षांत झालेल्या जलयुक्तच्या कामामुळे पडलेल्या पावसाचे पाणी साठले होते. या पाण्याचा उपयोग आतापर्यंत होत आहे. केवळ जलयुक्तच्या कामामुळे पडलेले पाणी जमिनित गेल्याने आज पाण्याची स्थिती चांगली आहे. 

तलाव पडले कोरडे

  • - जिल्ह्यातील उजनी धरण भरले असले तरी सात मध्यम प्रकल्पात अवघे २५.५६ द.ल.घ.मी. पाणीसाठा आहे. ५६ लघू प्रकल्पापैकी अवघ्या ६ तलावात २.६२ टक्के पाणी आहे. उर्वरित ५० तलाव कोरडे आहेत.  तलाव कोरडे असल्यानेच पाण्याच्या टंचाईच्या झळा अधिक तीव्र होणार आहेत. 

पाणीपातळी सव्वादोन मीटरवर खोल

  • - जिल्ह्यातील जमिनीची पाणी पातळी आॅक्टोबर महिन्यात सव्वा दोन मिटरने खोलवर गेल्याने पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. 
  • - जिल्ह्यात साखर कारखाने व उसाचे क्षेत्र अधिक असले तरी पाण्याअभावी तसेच हुमणीच्या प्रादुर्भावामुळे वजनात मोठी घट येण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. 
  • - खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेल्याने हताश झालेल्या शेतकºयांना पावसाअभावी रब्बी हंगामावरही पाणी सोडावे लागणार आहे.  
टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषदWaterपाणी