शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री, भारत भालके यांच्यात खडाजंगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 8:43 AM

पंढरपूर तालुक्यात एकाच रस्त्याचे दोनदा उद्घाटन: जिल्हाधिकारी म्हणाले कार्यक्रमाचे नियोजन करणाºया अधिकाºयांवर कारवाई करू

ठळक मुद्देसरकोली ते फुलेनगर रस्ता दुरुस्तीच्या कामाचे दोनदा उद्घाटनपालकमंत्री विजयकुमार देशमुख व आमदार भारत भालके यांच्यात उद्घाटनावरून कलगीतुरा चुका करणाºया अधिकाºयांवर कारवाई - जिल्हाधिकारी

सोलापूर : पंढरपूर तालुक्यातील सरकोली ते फुलेनगर रस्ता दुरुस्तीच्या कामाचे दोनदा उद्घाटन झाल्याचे पडसाद जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा नियोजन समितीत उमटले. पालकमंत्री विजयकुमार देशमुख व आमदार भारत भालके यांच्यात उद्घाटनावरून कलगीतुरा झाल्यावर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी याची गंभीर दखल घेत उद्घाटन कार्यक्रम करताना चुका करणाºया अधिकाºयांवर कारवाई केली जाईल असा इशारा दिला. 

सरकोली ते फुलेनगर रस्ता दुरुस्तीसाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत निधी मंजूर झाला आहे. ३0 जून रोजी आमदार भारत भालके यांनी कार्यकर्त्यांसमवेत या रस्त्याच्या कामाचे कुदळ मारून भूमिपूजन केले.  त्यानंतर ८ सप्टेंबर रोजी आमदार प्रशांत परिचारक यांनी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना निमंत्रित करून याच रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन केले. रस्ते कामाच्या श्रेयासाठी झालेल्या या खटाटोपाचे वृत्त दोन्ही छायाचित्रांसह लोकमतने ११ सप्टेंबर रोजी हॅलो सोलापूर पुरवणीत ‘रस्ता एकच : कुदळ मारली दोनवेळा’ अशा मथळ्याखाली ठळकपणे प्रसिद्ध केले. या वृत्ताची जिल्ह्यात खूपच चर्चा झाली. त्यानंतर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या निमित्ताने पालकमंत्री देशमुख व आमदार भालके यांची समोरासमोर भेट झाली. 

पालकमंत्री देशमुख यांना खटकलेली ही बाब रहावली नाही. त्यांनी बैठकीदरम्यानच भालके यांना थेट प्रश्न केला. आम्ही सत्ताधारी आहोत, आम्हाला न विचारताच रस्त्याचे उद्घाटन करता हे बरोबर नाही अशा शब्दात नाराजी व्यक्त केली. आमदार भालके यांनीही क्षणाचा विलंब न करता उत्तर दिले, मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करून मी रस्त्याचे काम मंजूर करून घेतले आहे. माझ्या मतदारसंघातील रस्ता आहे. राज्यपालांचा अध्यादेश तपासा, मी जे केले ते बरोबरच आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी या दोघांमधील खडाजंगी पाहिली व लागलीच सावरत त्यांनी संबंधित अधिकाºयांनी यापुढे विकासकामांच्या उद्घाटनाचे नियोजन करताना त्या कामाशी संबंधित सर्व लोकप्रतिनिधींशी समन्वय ठेवावा. यापुढे अशी चूक झाल्यास कारवाई केली जाईल असा इशारा दिला. त्यानंतर या वादावर पडदा पडला.

सुभाष माने यांनी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती वाटप प्रलंबित असल्याचे निदर्शनाला आणले. त्यावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी चव्हाण यांनी बँक खाते लिंक न केलेले ११00 प्रस्ताव राहिल्याचे स्पष्ट केले. 

धवलसिंह बसले मागे- डीपीसीच्या बैठकीत सदस्यांबरोबर कार्यकर्त्यांनी शिरकाव केल्याने सभागृह भरून गेले होते. शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील यांनी आमदार प्रशांत परिचारक यांना नियोजन समितीच्या बैठकीला हजर राहू देणार नाही असा इशारा दिला होता. त्यामुळे ते आमदार भालके यांच्या शेजारी पुढील आसनावर येऊन बसले होते. उशिरा आलेल्या धवलसिंह मोहिते-पाटील यांना जागा न मिळाल्याने ते मागील आसनावर जाऊन बसले. ही बाब लक्षात आल्यावर पालकमंत्री देशमुख यांनी बैठकीत सदस्य आणि अधिकाºयांनीच बसावे असा इशारा दिला. त्यावर काही कार्यकर्ते उठून गेले. महापालिका व जिल्हा परिषदेसंबंधी सदस्यांनी वारंवार प्रश्न उपस्थित केल्याने आमदार गणपतराव देशमुख संतापले. हे प्रश्न तुम्ही तुमच्या सभांमध्ये मांडा असे त्यांनी ठणकावले. त्यावर पालकमंत्री देशमुख यांनी जिल्हा परिषदेची वेगळी बैठक घेऊ, नियोजनाचे विषय संपवा असा सल्ला दिला. 

औषधांच्या टंचाईबाबत तक्रारी- शहर व जिल्ह्यात डेंग्यू, चिकुनगुनिया व स्वाईन फ्लूच्या साथीबाबत आमदार प्रणिती शिंदे, फिरदोस पटेल, शैला गोडसे, श्रीकांत देशमुख, आनंद चंदनशीवे यांनी लक्ष वेधले. पालकमंत्री देशमुख यांनी सोमवारी आढावा बैठक घेऊन उपाययोजनेच्या सूचना दिल्याचे सांगितले. त्यावर आमदार भारत भालके संतापले, अनेक दवाखान्यात औषधसाठा नाही, नगरपालिका पातळीवर कोणत्याच सूचना नाहीत, दवाखान्यात अधिकारी उपस्थित असतात का याची तपासणी होत नसल्याची तक्रार केली. जिल्हा शल्य चिकित्सक अंदूरकर, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. नवले यांनी दिलेल्या उत्तरांवर सदस्यांचे समाधान झाले नाही. वैराग येथील १0८ अ‍ॅम्बुलन्सचा चालक नशेत असतो अशी तक्रार सदस्याने केली. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयVijaykumar Deshmukhविजयकुमार देशमुखBharat Bhakkeभारत भालके