सोलापूर जिल्ह्याचा बारावीचा निकाल 85.81 टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 14:07 IST2019-05-28T14:05:01+5:302019-05-28T14:07:37+5:30

यंदाही मुलींचीच बाजी प्रमाण 92.70 तर टक्के

Solapur district has achieved 85.81 percent results | सोलापूर जिल्ह्याचा बारावीचा निकाल 85.81 टक्के

सोलापूर जिल्ह्याचा बारावीचा निकाल 85.81 टक्के

ठळक मुद्देबारावीचा निकाल जाहीरनिकाल पाहण्यासाठी शाळा महाविद्यालयात विद्यार्थ्यांची गर्दीदरवर्षीप्रमाणे मुलींनीच मारली यंदाही बाजी

सोलापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने घेण्यात घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीचा निकाल मंगळवारी दुपारी एक वाजता जाहीर झाला. यामध्ये सोलापूर जिल्ह्याचा निकाल 85. 81 टक्के लागला. यामध्ये यंदाही ही मुलींनीच बाजी मारल्याचे दिसून आले. त्यांनी 92. 70% गुण मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण शेकडा 81.39 टक्के आहे.


सोलापूर जिल्ह्यातून इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी सर्व शाखांमधून नियमित व बहिस्थ असे 54782 विद्यार्थी-विद्यार्थिनी विद्यार्थिनींची महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडे नोंदणी झाली होती. यापैकी 46 हजार 955 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.  त्यामध्ये मुले 27147 तर मुली 19808 असे प्रमाण आहे. यावरून मुलींनी आपले वर्चस्व सिद्ध केल्याचे दिसते. मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 81. 39 टक्के आहे तर मुलींचे 92.70 असे प्रमाण असल्‍याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे.

Web Title: Solapur district has achieved 85.81 percent results

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.