शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

राज्यातील ऊस गाळपात यंदाही सोलापूर जिल्हा राज्यात प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 4:24 PM

सोलापूरचे सर्वच ३१ कारखाने बंद; गाळपात कोल्हापूर दुसºया तर अहमदनगर तिसºया क्रमांकावर

ठळक मुद्देराज्यातील १९५ साखर कारखान्यांपैकी माढा तालुक्यातील पिंपळनेरच्या विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे ऊस गाळप उच्चांकी १९५ साखर कारखान्यांचे एकूण ९१७.०३  लाख मे.टन गाळप झाले असून एक हजार २५ लाख क्विंटल साखर तयार

सोलापूर : ऊस गाळपात यंदाही सोलापूर जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावरच असून दुसºया क्रमांकावर कोल्हापूर तर तिसºया क्रमांकावर अहमदनगर जिल्हा आहे. सोलापूर जिल्ह्यातील हंगाम सुरू केलेले सर्वच ३१ कारखाने बंद झाले असले तरी कोल्हापूर व अहमदनगरचे काही कारखाने अद्यापही सुरू आहेत.

राज्यातील साखर हंगाम यावर्षी एक नोव्हेंबर रोजी सुरू झाला होता. यावर्षी सर्वाधिक सहकारी व खासगी अशा १९५ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला. नोव्हेंबरमध्ये सुरू झालेले साखर कारखाने पाच फेब्रुवारीपासून बंद होण्यास सुरुवात झाली. आतापर्यंत राज्यातील १२० हून अधिक साखर कारखाने बंद झाले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील सर्वच ३१ कारखान्यांचा पट्टा पडला असून, जिल्ह्याचे एकूण गाळप एक कोटी ५९ लाख ९५ हजार ७४२ मे.टन इतके झाले आहे. साखर उत्पादन एक कोटी ६३ लाख ६६ हजार ६५३ क्विंटल इतके झाले असून साखर उतारा १०.२३ इतका पडला आहे. 

राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे गाळप सर्वाधिक आहे. यावर्षी सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक ३१ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला होता. यापूर्वी अधिकाधिक ३० पर्यंतच साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला होता. 

सोलापूर जिल्ह्यानंतर कोल्हापूर व अहमदनगर जिल्ह्याचे गाळप आहे, कोल्हापूरच्या २२ कारखान्यांनी एक कोटी २९ लाख ७० हजार मे.टन. तर अहमदनगर जिल्ह्याचे एक कोटी २७ लाख ६५ हजार मे. टन. गाळप झाले आहे, कोल्हापूरच्या पाच तर अहमदनगरच्या १५ साखर कारखान्यांचे गाळप अद्यापही सुरू आहे. त्यामुळे कोल्हापूर व अहमदनगर जिल्ह्यापैकी दुसºया क्रमांकावर कोण?,हे संपूर्ण कारखाने बंद झाल्यानंतरच समजणार आहे; मात्र सोलापूर जिल्ह्यापेक्षा अन्य कोणताही जिल्हा गाळप करु शकणार नाही कारण राज्यातील सर्वच जिल्ह्यांचा हंगाम अखेरला आला आहे.

विठ्ठलराव शिंदे राज्यात पहिला

  • - यावर्षी हंगाम सुरू केलेल्या राज्यातील १९५ साखर कारखान्यांपैकी माढा तालुक्यातील पिंपळनेरच्या विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे ऊस गाळप उच्चांकी म्हणजे १७ लाख ४४ हजार १४९ मे. टन इतके झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील जवाहर कारखान्याचे गाळप १६ लाख ८९ हजार ६०० मे. टन इतके झाले असून हा कारखाना सुरू आहे. त्यामुळे आज तरी विठ्ठलराव शिंदे कारखाना गाळपात राज्यात प्रथम आहे.
  • च्राज्यातील १९५ साखर कारखान्यांचे एकूण ९१७.०३  लाख मे.टन गाळप झाले असून एक हजार २५ लाख क्विंटल साखर तयार झाली आहे. राज्याचा साखर उतारा ११.१५ टक्के इतका मिळाला आहे.

 

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेMaharashtraमहाराष्ट्र