शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

कर्जमाफीमुळे सोलापूर जिल्हा बँक सावरली... तरीही तोटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 9:10 AM

जिल्हा मध्यवर्ती बँक : शेतीकर्ज थकबाकीवर ३२५ कोटींची एनपीएमध्ये तरतूद

ठळक मुद्देसंचालक मंडळाची संबंधित युनिटकडे ९५० कोटी रुपये इतकी थकबाकी मागील वर्षी ३१ टक्के असलेला एनपीए या आर्थिक वर्षात ३९ टक्के झाला थकबाकीमुळे बँक अधिक आर्थिक अडचणीत आली

सोलापूर : राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेची अंमलबजाणी करण्यासाठी मिळालेल्या ४२६ कोटी रूपयांतून  सोलापूर जिल्हा बँकेने आपली देणी भागविल्यामुळे आर्थिक वर्ष सन २०१६ - १७ मध्ये  ६१ कोटी ५५ लाख रुपये तोट्यात असलेली जिल्हा बँक यावर्षी काहीशी सावरली आहे. मात्र शेतीकर्जाच्या थकबाकीपोटी ३२५ कोटींची ‘एनपीए’साठी तरतूद करावी लागली, अशी माहिती बँकेचे सरव्यवस्थापक किसन मोटे यांनी दिली.

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक यावर्षी सावरली ती छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेमुळे. मागील वर्षात बँकेला ६१ कोटी ५५ लाख रुपये तोटा झाला होता. यावर्षी  बँकेला कर्जमाफीचे ४२६ कोटी रुपये शासनाकडून आले. यामध्ये जवळपास ५७ कोटी रुपये नियमित कर्ज भरणाºया शेतकºयांच्या खात्यावर प्रोत्साहनपोटी दिले आहेत. यावर्षी बँकेला व्यावसायिक नफा ३ कोटी ७८ लाख रुपये झाला असला तरी शेती व बिगरशेतीच्या थकबाकीवर एनपीएत तरतूद केल्याने बँकेचा तोटा २७ कोटी ५४ लाख १५ हजार रुपये झाला आहे. शेती कर्जावरील थकबाकीवर मागील वर्षी २६१ कोटी तरतूद केली होती.

 ती यावर्षी ३२५ कोटी एवढी केली आहे. शेती कर्जावर मागील वर्षीपेक्षा ६३ कोटी ९७ लाख रुपयांची तरतूद करावी लागल्याने २४.४३ टक्के एनपीएत वाढ झाल्याचे सांगण्यात आले. बिगरशेतीसाठीच्या थकबाकीवर मागील वर्षीपेक्षा अवघ्या ५ कोटी ७८ लाख रुपयांची तरतूद केली असल्याचे किसन मेटे यांनी सांगितले.शासनाकडून पैसा येण्यास विलंब...

  • - जून २०१७ मध्ये शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीचे शासनाकडून ६३ कोटी ९७ लाख रुपये अद्यापही मिळाले नाहीत. ही रक्कम बँकेला मिळाली असती तर बँकेचा एनपीए कमी झाला असता असे बँकेचे माजी अध्यक्ष राजन पाटील यांनी सांगितले. कर्जमाफी जाहीर करुन १५ महिन्यांचा कालावधी लोटला तरी शासनाकडून पैसे येण्यास विलंब होत असल्याचा आरोप पाटील यांनी केला.

एनपीए ३९ टक्क्यांवर..- संचालक मंडळाची संबंधित युनिटकडे ९५० कोटी रुपये इतकी थकबाकी असून ती वरचेवर वाढतच आहे. शेतकºयांकडील थकबाकीही वरचेवर वाढत असल्याने बँकेचा एनपीए मागील वर्षीच्या तुलनेत वाढला आहे.  मागील वर्षी ३१ टक्के असलेला एनपीए या आर्थिक वर्षात ३९ टक्के झाला आहे. थकबाकीमुळे बँक अधिक आर्थिक अडचणीत आली असती मात्र कर्जमाफीची रक्कम बँकेला मिळाल्याने बँक काहीअंशी सावरली आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरBanking Sectorबँकिंग क्षेत्र