शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

सोलापूर जिल्हा प्रशासन चिंतेत; गर्दीच्या ठिकाणांवर कडक निर्बंध असताना कारवाई का होईनात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 13:31 IST

मर्यादेपेक्षा जास्त गर्दी असलेल्या लग्न समारंभांवर कारवाई करा; जिल्हा प्रशासन चिंतित : आदेशाची अंमलबजावणी का होईना

सोलापूर : गर्दीच्या ठिकाणांवर कडक निर्बंध असताना कारवाई का होईनात? याबाबत प्रशासनाने चिंता व्यक्त केली असून, मर्यादेपेक्षा जास्त गर्दी असलेले मंगल कार्यालये तत्काळ बंद करा. वेळप्रसंगी लग्न समारंभांवर कारवाई करा, असे आदेश जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज बैठक घेतली. त्या बैठकीत कोरोना प्रसार रोखण्यासाठी काय उपाययोजना करता येतील यावर चर्चा झाली. आज झालेल्या चर्चेनुसार पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना अहवाल सादर केला जाणार आहे. पालकमंत्री भरणे बुधवारी सोलापूर दौऱ्यावर येणार असून, ते अंतिम निर्णय घेणार आहेत.

नियोजन भवन येथे झालेल्या बैठकीस अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, उपायुक्त वैशाली कडूकर आदी उपस्थित होते. बैठकीत मंगल कार्यालयाबरोबरच आठवडी बाजार, जनावरांचे बाजार बंद करणे, मंदिरातील भाविकांच्या संख्येवर मर्यादा आणणे, परमिट रुम, जिम्नैशिअम, बागा, अन्नछत्र मंडळ बंद ठेवणे, दुकानांच्या वेळा, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कामकाजाच्या कडक निर्बंध आणावेत, अशा विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.

या बैठकीस उपविभागीय अधिकारी ज्योती कदम, शमा ढोक, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव, लस समन्वयक डॉ. अनिरुद्ध पिंपळे, गटविकास अधिकारी राहुल देसाई, प्राथमिक शिक्षण अधिकारी संजय राठोड, उपविभागीय अधिकारी दीपक शिंदे यांच्यासह गटविकास अधिकारी, नगरपालिका मुख्याधिकारी, आरोग्य, पोलीस, प्रादेशिक परिवहन, अन्न आणि औषध प्रशासन, सहकार विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय