शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
2
Nepal Protest : नेपाळमधील आंदोलनाचा सीमेवर परिणाम, सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण; भारतीय पर्यटकांना रोखले
3
जीएसटीचा 'सुतक'काळ...! शोरुममध्ये कधी नव्हे तो शुकशुकाट...; लोक येतायत अन् विचारून जातायत...
4
दुचाकी दुर्लक्षितच राहिल्या...! जिव्हाळ्याची हिरो स्प्लेंडर ८ हजारांनी कमी होणार, एचएफ डीलक्स ६, एक्स्ट्रीम...
5
९२% नं आपटून १ रुपयांवर आला 'हा' शेअर; आता कंपनी देणार एकावर १० बोनस शेअर्स
6
महापौर ते थेट नेपाळ पंतप्रधानपदाच्या शर्यतीत समोर आलेले बालेन शाह यांची संपत्ती किती?
7
५० लाखांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त! फक्त ₹५,०५० ची गुंतवणूक वाचवेल लाखो रुपयांचे व्याज
8
दृष्टिहीन वडिलांसोबत भीक मागायची लेक; अभ्यासात हुशार, परिस्थितीवर मात करत बदललं नशीब
9
PM KP Sharma Oli Resign: अखेर नेपाळमध्ये सत्तांतर! पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी दिला राजीनामा; देश सोडून पळाले?
10
करिश्माच्या मुलांचा सावत्र आईवर फसवणुकीचा आरोप, संजय कपूरच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीमध्ये मागितला वाटा
11
सामान्य चार्जिंग आणि वायरलेस चार्जिंगमध्ये काय फरक आहे? जाणून घ्या...
12
'ब्रिक्स देश अमेरिकेसाठी पिशाच्च; लवकरच युती तुटणार', पीटर नवारो यांनी पुन्हा गरळ ओकली
13
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात ठेवलेल्या नैवेद्याला कावळा शिवत नाही? नक्कीच हातून घडत असणार 'या' ५ चुका!
14
₹२ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांच्या उड्या; ४३ दिवसांपासून सातत्यानं अपर सर्किट, तुमच्याकडे आहे?
15
"ती स्वभावाने खूप शांत आहे..."; अजित पवारांमुळे चर्चेत आलेल्या IPS अंजना कृष्णाचे वडील काय म्हणाले?
16
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचा जर्मन कंपनीसोबत नवीन व्यवसाय, ६ महिन्यांत शेअरने दिला ४२% परतावा
17
मीच माझ्या रुपाची राणी ग! सेल्फी पाहून लोकांनी उडवली खिल्ली पण 'तिने' डिलीट केला नाही फोटो
18
RBI Recruitment: रिझर्व्ह बँकेत ऑफिसर पदांसाठी भरती, १ लाख पगार! कोण करू शकतं अर्ज?
19
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
20
एसीच्या स्फोटाने दिल्ली हादरली; पिझ्झा आउटलेटमध्ये जोरदार स्फोट!

Solapur Crime: घरकुलाचा वाद आणि १० वर्षाच्या कार्तिकची हत्या; आरोपी निघाला जवळचा नातेवाईक, सीसीटीव्हीमुळे गूढ उलगडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 15:12 IST

Solapur Crime News Marathi: १० वर्षाच्या कार्तिक खंडाळे या मुलाची हत्या करण्यात आली. त्याची हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून, त्याने हत्येचे कारण सांगितले. 

Solapur Crime News Today: अरण येथून १५ जुलै बेपत्ता रोजी झालेल्या कार्तिक खंडागळे या दहा वर्षीय शालेय विद्यार्थ्याच्या खुनाचे धागेदोरे टेंभुर्णी पोलिसांनासीसीटीव्हीच्या माध्यमातून हाती लागले. मारेकरी हा चुलत भाऊच असून, त्याने घरकुलावरून भावा भावाच्या वादविवादातून खून केल्याची कबुली पोलिसांपुढे दिली आहे. त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायदंडाधिकाऱ्यांनी तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

चुलत भाऊ संदेश सहदेव खंडाळे (वय १९) असे आरोपीचे नाव असून, त्याला पोलिसांनी शनिवारी रात्री ताब्यात घेत आपला खाक्या दाखवला. यावेळी त्याने कार्तिकला मारल्याची कबुली दिली. या घटनेनंतर आरोपीला तपास कामासाठी पथकाने घटनास्थळी नेल्याचे पोलिसांनी सांगितले. 

आरोपी संदेशने कार्तिकला मंगळवारी सायंकाळी ६:३० वाजता अरणहून मोडनिंब येथे मोटारसायकलवर बसून आणले. त्याला खाण्यासाठी हॉटेलमधून पेढे व भेळ घेऊन दिली. त्यानंतर त्याला गाडीवर बसवून नेऊन त्याची हत्या केली, अशी माहिती सीसीटीव्हीतील तपासातून पुढे आली आहे.

कार्तिकचा मृतदेह सापडताच टेंभुर्णी पोलिस स्टेशनचे निरीक्षक नारायण पवार, कुलदीप सोनटक्के, गिरीष जोग, सहदेव देवकते, स्वाती सुरवसे यांच्या पथकाने तपासाची सूत्रे वेगाने फिरवली.

सीसीटीव्हीमुळे प्रकरणाचे गूढ उलगडले

कार्तिकचा खून होऊन चार दिवस उलटत असताना त्याच्या मारेकरी सापडत नसल्याने कुटुंबात अस्वस्थता निर्माण झाली होती. 

दरम्यान, मृतदेह सापडताच नातेवाईक आणि ग्रामस्थ संतप्त झाले आणि पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. मोडनिंब ग्रामपंचायत येथील सीसीटीव्ही फुटेज तपासताच आरोपी चुलत भाऊ हा कार्तिकला दुचाकीवर बसवून नेताना कॅमेऱ्यात कैद झाला. त्यानंतर पोलिसांनी चुलत भावाला ताब्यात घेतले.

आणखी कोणाचा सहभाग आहे का ?

सध्या एका आरोपीला जेरबंद केले असले तरी या प्रकरणामध्ये आणखी कोणाचा सहभाग होता का, या मुद्यावर पोलिस तपास करीत आहेत. शनिवारी रात्री सोलापूर येथून कार्तिकचा मृतदेह उत्तरीय तपासणी करून पाठविण्यात आला. रात्री १०:३० वाजता अरण येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीसcctvसीसीटीव्हीPoliceपोलिस