शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Solapur: कॉँग्रेस सत्तेत आल्यास ‘किसान न्याय गॅरंटी’ लागू करणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2024 13:32 IST

Solapur News: देशात कॉँग्रेस सरकार आले तर शेतकऱ्यांच्या विकासासाठी ‘किसान न्याय गॅरंटी’ लागू करणार. यातून शेतकऱ्यांच्या सर्व समस्या साेडविल्या जाणार आहे, असे कॉँग्रेसचे गोवा प्रभारी आणी किसान सेलचे अध्यक्ष शैलेश अग्रवाल यांनी पणजीतील कॉँग्रेसच्या कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

- नारायण गावस पणजी - देशात कॉँग्रेस सरकार आले तर शेतकऱ्यांच्या विकासासाठी ‘किसान न्याय गॅरंटी’ लागू करणार. यातून शेतकऱ्यांच्या सर्व समस्या साेडविल्या जाणार आहे, असे कॉँग्रेसचे गोवा प्रभारी आणी किसान सेलचे अध्यक्ष शैलेश अग्रवाल यांनी पणजीतील कॉँग्रेसच्या कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी त्यांच्या सोबत गोवा प्रदेश कॉँग्रेसचे विरेंद्र शिरोडकर व इतर सदस्य उपस्थित होते.

शैलेश अग्रवाल म्हणाले, भाजपने शेतकऱ्यांची गेली १० वर्षे फसवणूक केली म्हणून देशभर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. आता कॉँग्रेस सरकार सत्तेवर आल्यावर किसान न्याय गॅरंटी मार्फत आम्ही शेतकऱ्यांच्या सर्व समस्या जाणून घेतल्या जाणार. ऋणमुक्त आयोग लागू करुन शेतकऱ्यांचा सर्व कर्ज माफ केला जाणार आहे. शेतकऱ्यांना ३० दिवसांच्या आत पिकावरील विमा दिला जाणार आहे. याेग्य प्रकारे आयात निर्यात पॉलिसी लागू करणार. शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य हमीभाव दिला जाणार आहे. तसेच कृषी वापरावरील साहित्याची जीएसटी रद्द केली जाणार आहे.

शैलेश अग्रवाल म्हणाले, भाजपच्या केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी विमा सुरु केला पण त्या विम्याचा योग्य लाभ शेतकऱ्यांना झाला नाही तर या विम्याचा लाभ जास्त विमा कंपन्यांना तसेच उद्योजकांना झाला आहे. या भाजपला सर्वसामान्य गरीब शेतकऱ्यांचे काहीच पडलेले नाही. भाजपने शेतकऱ्यांना योग्य प्रमाणात हमीभावही दिलेला नाही. कृषी साहित्यावर जीएसटी वाढवून शेतकऱ्यांना त्रास िदिला. खत, बी, बियाणी यांच्या किमती वाढविल्या म्हणून आज देशभर शेतकरी भाजपच्या विरोधात आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसgoa lok sabha election 2024गोवा लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४