Solapur: आयुक्तांनी केली उजनीची पाहणी; जलवाहिनीच्या कामासाठी अधिकाऱ्यांना सांगितल्या या गोष्टी
By Appasaheb.patil | Updated: July 18, 2023 14:53 IST2023-07-18T14:53:27+5:302023-07-18T14:53:49+5:30
Solapur: सोलापूर महापालिकेच्या आयुक्त शितल तेली-उगले यांनी मंगळवारी सकाळी उजनी धरणाची पाहणी केली. याचबरोबरच स्मार्ट सिटीच्यावतीने सुरू असलेल्या उजनी-सोलापूर दुहेरी जलवाहिनीच्या कामांची पाहणी केली.

Solapur: आयुक्तांनी केली उजनीची पाहणी; जलवाहिनीच्या कामासाठी अधिकाऱ्यांना सांगितल्या या गोष्टी
- आप्पासाहेब पाटील
सोलापूर - सोलापूर महापालिकेच्या आयुक्त शितल तेली-उगले यांनी मंगळवारी सकाळी उजनी धरणाची पाहणी केली. याचबरोबरच स्मार्ट सिटीच्यावतीने सुरू असलेल्या उजनी-सोलापूर दुहेरी जलवाहिनीच्या कामांची पाहणी केली. सोलापूर शहराला सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले.
या पाहणी दौऱ्यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, सार्वजनिक आरोग्य अभियंता विजय राठोड, उपअभियंता व्यंकटेश चौबे, पोचमपाड कंपनीचे रंगा राव, एम.जी.पी चे एम.एस हरीश, विजयकुमार नलावडे, अरुण पाटील, देविदास मादगुंडे आदी उपस्थित होते. शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी उजनीतून पाणीपुरवठा होतो. मात्र उजनी धरणाची पाणीपातळी खालाविल्याने महापालिका दुबार पंपिंगव्दारे पाण्याचा उपसा करून शहराला पाणीपुरवठा करीत आहे. उजनीतील पाणीपातळी व जलवाहिनीचे सुरू असलेले कामकाजांची आयुक्तांनी पाहणी केली. त्यानंतर संबंधितांना वेळेत काम पूर्ण करण्यासाठी सुचना दिल्या. शिवाय चार्टनुसार कामे करण्याचेही सांगितले. उजनी-सोलापूर दुहेरी जलवाहिनीचे काम पूर्ण करून सोलापूरकरांना सुरळीत, मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.