शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकारच्या इंधन दरवाढीच्या विरोधात सोलापूर शहर युवक राष्ट्रवादीचे दुचाकी ढकलो आंदोलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2021 13:14 IST

वाह रे मोदी तेेेरा खेेेल; सस्ती दारू महेंगा तेेेल

सोलापूर : केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल,डिझेल दरवाढीचा निषेध करण्यासाठी सोलापूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष जुबेर बागवान यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी विजापूर वेस ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत "गाडी ढकलो" आंदोलन करून सरकारचा निषेध करण्यात आला. महागाईचा उडाला भडका, केंद्र सरकारला द्या तडका, उठा उठा महागाई आली, मोदी सरकार जाण्याची वेळ आली, बेचारी जनता करे पुकार, लूट राही है मोदी सरकार, आम आदमी और किसान, झेल रहा पेट्रोल-डिझेल कि मार, वाह रे मोदी तेरा खेल , सस्ती दारू महेंगा पेट्रोल आदी गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

सोमवारी सकाळी ११ वाजता विजापूर वेस येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष जुबेर बागवान यांच्या नेतृत्वाखाली  संख्येने कार्यकर्ते जमले. तेथून सर्व कार्यकर्ते आपली दुचाकी वाहने ढकलत आणि मोदी सरकारच्या विरोधात घोषणा देत बेगम पेठ पोलीस चौकीमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आले. तेथे आल्यानंतर मोदी सरकारच्या पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा निषेध नोंदविण्यात आला. 

 पेट्रोल आणि डिझेल दरवाढीमुळे सामान्य जनतेचे जगणे मुश्किल बनले आहे. दिवसागणिकच इंधनाच्या दरात वाढ होत आहे. यामध्ये सामान्य जनता होरपळून निघत आहे. कोरोनामुळे लाखो लोकांचे रोजगार गेले आहेत.त्यातच आता इंधन दरवाढीचा दुहेरी सामना नागरिकांना करावा लागत आहे. इंधनाची सतत होणारी वाढ सामान्य जनतेची झोप उडविणारी ठरत आहे. वाढत्या महागाईचा भार मध्यमवर्गीय आणि सामान्य जनतेवर पडत आहे.मोदी सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळे उत्पन्न कमी आहे. बँकांमध्ये कर्जाचा बोजा वाढलेला असल्याने व नोटबंदीमुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडली असतानाच आता इंधन दरवाढीचा भुर्दंड सामान्य नागरिकांना सहन करावा लागत असल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर "गाडी ढकलो"आंदोलन करून मोदी सरकारचे लक्ष वेधण्यात आले.   यावेळी रमीज कारभारी, विक्रांत खुणे,प्रवीण साबळे, चेतन गायकवाड, सपन्न दिवाकर,सरफराज बागवान, झहीर गोलंदाज, विवेक फुटाणे, विशाल कल्याणी, आशिष बसवंती,मुबिन शेख, तुषार जक्का, प्रवीण फाळके,जावेद कोटकोंडी, कुणाल वाघमारे,आरिफ बागवान,रमीज मुल्ला, कामले, मोहसीन मुजावर, फरदिन शेख, अदनान शेख, शोएब बागवान आदी उपस्थित होते.

टॅग्स :SolapurसोलापूरNCPराष्ट्रवादी काँग्रेसStrikeसंपPetrolपेट्रोलBJPभाजपा