शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
2
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
3
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
4
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
5
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
6
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
7
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
8
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
9
...ती पैशानंही 'गब्बर' झाली होती; टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचे शेवटचे ३ कॉल
10
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
11
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
12
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
13
टॅक्स भरण्यासाठी आता सीएकडे जाण्याची गरज नाही; सरकारच्या ई-पे टॅक्स पोर्टलवरुन होईल काम
14
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
15
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
16
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."
17
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच
18
पत्नीच्या मदतीनं करू शकता ₹४४,७९३ च्या मंथली पेन्शनचा जुगाड; एका झटक्यात मिळतील ₹१,११,९८,४७१
19
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
20
Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते

विक्रमी चौका...‘देशमुखां’च्या नावातच ‘विजय’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 12:59 IST

solapur-city-north Vidhan Sabha Election Results 2019: शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ; वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आनंद चंदनशिवे यांचा केला पराभव

ठळक मुद्देशहर उत्तर विधानसभा मतदारसंघात १५ उमेदवार निवडणूक रिंगणात होतेपालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी या मतदारसंघात सलग चौथ्यांदा निवडणूक लढविली देशमुख यांनी सन २०१४ च्या निवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवारांवर ६८ हजार ८७८ चे मताधिक्य घेतले

राजकुमार सारोळे

सोलापूर : शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी ७३ हजार ६८ मताधिक्याने चौथ्यांदा विजय संपादन केला आहे. प्रतिस्पर्धी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आनंद चंदनशिवे यांचा त्यांनी पराभव केला. 

शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात १५ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी या मतदारसंघात सलग चौथ्यांदा निवडणूक लढविली आहे. देशमुख यांना ९६ हजार ५२९ तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार नगरसेवक आनंद चंदनशिवे यांना २३ हजार ४६१ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार, माजी महापौर मनोहर सपाटे यांना १९ हजार २०५ मते मिळाली. देशमुख हे ७३ हजार ६८ मताधिक्यांनी विजयी झाले. इतर उमेदवारांना पडलेली मते पुढीलप्रमाणे आहेत. बसपाचे नामदेव रास्ते: ११२२, आंंबेडकर राईट पार्टी आॅफ इंडियाचे खंडू धडे: ३७४, एमआयएमचे अतिश बनसोडे: ५३८६, संभाजी ब्रिगेडचे सोमनाथ राऊत: १0५८, हिंदुस्तान जनता पार्टीचे हसन कुरेशी: ६७१, अपक्ष: अहमद कुरेशी: ३२९, सिद्राम ईरकशेट्टी: १२५, अहमद मोमीन: ३२९, विजय चोळ्ळे: १४२, जयराज नागणसुरे:३१३, नागमणी जक्कन: ३६१, मनीषा माने: १५६, विष्णू खंदारे: २८८, नोटा: २१५३. 

निवडणूक निर्णय अधिकारी दीपक शिंदे यांनी सकाळी आठ वाजता मतमोजणीला प्रारंभ केला. सुरुवातीला पोस्टल मते मोजणीसाठी घेण्यात आली. विशेष म्हणजे या मतदारसंघात ४२३ पोस्टल मते होती, यापैकी दोघांनी नोटाला पसंती दर्शविली आहे. देशमुख यांना २७३ तर चंदनशिवे यांना ७५ आणि सपाटे यांना ६३ मते मिळाली आहेत. पहिल्या फेरीपासून देशमुखांनी आघाडी घेतली. दुसºया फेरीला देशमुख यांना १०५६६, सपाटे यांना २२१७ आणि चंदनशिवे यांना १४९७ मते मिळाली. या फेरीत देशमुख यांची आघाडी ८३४९ इतकी होती. त्यानंतर प्रत्येक फेरीत त्यांचे मताधिक्य वाढत गेले. 

गतवेळचा रेकॉर्ड तोडलादेशमुख यांनी सन २०१४ च्या निवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवारांवर ६८ हजार ८७८ चे मताधिक्य घेतले होते. या निवडणुकीत देशमुख यांना ८६ हजार ८७७, राष्ट्रवादी काँग्रेसचे महेश गादेकर यांना १७ हजार ९९९ तर काँग्रेसचे विश्वनाथ चाकोते यांना १४ हजार ४५६ इतकी मते मिळाली होती. विशेष म्हणजे यावेळेस काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी असताना सपाटे यांना केवळ १९ हजार २०५ इतकीच मते मिळाली. यापूर्वी सपाटे यांनी अपक्ष म्हणून या मतदारसंघात निवडणूक लढविली होती. शहर उत्तर हा मतदारसंघ आघाडीच्या वाटणीत काँग्रेसच्या वाट्याला होता. राष्ट्रवादी काँग्रेसने आग्रह करून हा मतदारसंघ घेतला होता हे येथे उल्लेखनीय. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार चंदनशिवे हे विधानसभेला पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात असताना सपाटे यांच्यापेक्षा जादा मते घेतली. जनतेने विरोधी पक्ष म्हणून दिलेला कौल मला मान्य असल्याचे चंदनशिवे यांनी म्हटले आहे. 

पक्षाची साथ नाही: सपाटे- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रचाराची सुरूवात सोलापुरातून केली. राज्यभर झंझावात झाला व निवडणूक निकाल चांगले आले, पण सोलापुरात मला पक्षाच्या लोकांनीच साथ दिली नाही, अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उत्तरचे उमेदवार मनोहर सपाटे यांनी व्यक्त केली. आघाडीतील काँग्रेसचे नेते प्रचारासाठी फिरकले नाहीत. ज्यांच्याकडे प्रचाराची धुरा दिली ते मध्यमध्ये गुंतले. आहे ती मते मला पाहून मिळाली, पक्षाने योगदान दिले असते तर सोलापुरातही बदल झाला असता, असे ते म्हणाले. 

कार्यकर्त्यांचा जल्लोष- पालकमंत्री देशमुख यांनी पहिल्या फेरीपासून मताधिक्य घेतल्याचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला. राजवाडे चौकातील पालकमंत्री यांच्या कार्यालयासमोर कार्यकर्ते जमले. सर्वांनी फुले व गुलाल उधळत जल्लोष सुरू केला. यात पालकमंत्री देशमुख सहभागी झाले. त्यांच्यासमवेत चिरंजीव नगरसेवक किरण देशमुख, पुरुषोत्तम बरडे, बिज्जू प्रधाने, प्रताप चव्हाण, संजय कोळी, देविदास चेळेकर, प्रसाद कुलकर्णी यांनीही जल्लोष केला. तीन टर्ममध्ये केलेल्या विकासकामांना लोकांनी पसंती दिली. कार्यकर्त्यांनी मनापासून काम केल्यामुळे गेल्यावेळेपेक्षा जास्त मताधिक्य मिळाले, खºया अर्थाने हा कार्यकर्त्यांचा विजय आहे अशी प्रतिक्रिया पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी दिली. 

शहर उत्तर विजयाची कारणे...

  • - विजयकुमार देशमुख - तीन टर्ममध्ये केलेली विकासकामे़ सर्वसमावेशक राजकारण़ निवडणुकीत गटाचे एकत्रीकरण़ प्रबळ विरोधी उमेदवाराची वानवा़
  • पराभवाची कारणे...
  • - मनोहर सपाटे- पक्षाकडून ताकद कमी पडली़ आघाडीचे नेते फिरकले नाहीत़ एकास एक उमेदवार देण्यात अडचण़ मतदारांना आकर्षित करणाºया मुद्यांचा अभाव़ 
  • - आनंद चंदनशिवे - बहुजनामधून पहिलाच प्रयत्ऩ नागरी समस्यांवरच फोकस़ पक्षांतरामुळे मित्रांनी साथ सोडली़ एमआयएमबरोबर आघाडी झाली नाही़
टॅग्स :Solapurसोलापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकsolapur-city-north-acसोलापूर शहर उत्तरVijaykumar Deshmukhविजयकुमार देशमुखPoliceपोलिसVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी