शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर बाजार समिती ; शेतकºयाला मारहाण केलेल्या अडत्याचा परवाना रद्द करण्याचा ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 12:57 IST

सोलापूर बाजार समिती सभा : सभापतीसाठी नवीन गाडीचा विषय पेंडिंग 

ठळक मुद्देबैठकीला पालकमंत्री देशमुख, शिवानंद पुजारी व प्रकाश चोरेकर वगळता अन्य संचालक उपस्थितशेतकºयाला मारहाण करणाºया अडत्याचा परवाना रद्दशेतकºयांच्या मालाचे पैसे न देणाºया अडत्याला दिलेला गाळा काढून घेण्याचा ठराव संचालक मंडळाने घेतला

सोलापूर : शेतकºयाला मारहाण करणाºया अडत्याचा परवाना रद्द तर शेतकºयांच्या मालाचे पैसे न देणाºया अडत्याला दिलेला गाळा काढून घेण्याचा ठराव संचालक मंडळाने घेतला. सभापतीसाठी नवीन गाडी घेण्याच्या ठरावावर तूर्त हा निर्णय थांबवावा व दुष्काळी परिस्थितीत शेतकºयांना मदत करावी अशी चर्चा झाली.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची सभा शुक्रवारी सभापती दिलीप माने यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेत एकूण ५३ विषयांवर चर्चा झाली. बाजार समितीच्या आवारात माजी मंत्री आनंदराव देवकते यांचा पुतळा उभारण्याच्या विषयाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. संचालक शहाजी पवार यांनी पुतळा उभारणीसाठी शासन पातळीवरच्या परवानग्या मिळण्यासाठी मी प्रयत्न करेन असे सांगितले.

शेतकºयांसाठी भोजन या विषयावर एक रुपयात जेवण यापुढेही सुरू रहावे, गुणवत्तेचे जेवण मिळावे यासाठी वाढीव खर्च बाजार समिती व व्यापाºयांनी सोसावा असे संचालकांनी मत व्यक्त केले. नव्याने निविदा मागविण्यास मान्यता देण्यात आली.कांद्याच्या पोत्यावर झोपलेल्या शेतकºयास शिवीगाळ  व मारहाण केल्यामुळे मे. फारुक हबीबल्ला मोसंबीवाले अँड कंपनीचे चालक हबीबल्ला बागवान यांचा परवाना रद्द करण्याचा ठराव मंजूर झाला. शेतकºयांच्या शेतीमालाची बिले थकविणाºया  म.कैफ ट्रेडर्स पेढी इस्माईल हाजी म. इसाक बागवान चालक इस्माईल बागवान यांचा परवाना याअगोदरच रद्द करण्यात आला आहे. त्यानंतरही शेतकºयांचे पैसे दिले नसल्याने त्यांना दिलेला फळे व भाजीपाला विभागातील गाळा काढून घेण्याचा निर्णय झाला. अन्य विषयावर चर्चा होऊन मंजुरी देण्यात आली.

बैठकीला पालकमंत्री देशमुख, शिवानंद पुजारी व प्रकाश चोरेकर वगळता अन्य संचालक उपस्थित होते. बाजार समितीत सुरू असलेल्या प्रकल्पातील गांडूळ प्रतिकिलो चार रुपयाने विक्री करण्याचा तसेच सध्या सभापतीसाठी असलेली गाडी दुष्काळी स्थितीमुळे विक्री करून नव्याने न घेता हाच पैसा शेतकºयांसाठी खर्च करण्याचा मुद्दा श्रीमंत बंडगर यांनी मांडला. उपसभापती श्रीशैल नरोळे यांनी नव्याने दोन गाड्या घ्या व सध्याची जुनी गाडी विक्री करू नये असा मुद्दा मांडला. संचालक शहाजी पवार, अशोक निंबर्गी व श्रीमंत बंडगर यांनी बैठक भत्ता लोकमंगल अन्नपूर्णा योजनेला देण्यात आला.

पालकमंत्री आजही गैरहजर- बाजार समिती संचालक मंडळाच्या बैठकीला संचालक तथा पालकमंत्री विजयकुमार देशमुख आजच्या बैठकीलाही गैरहजर होते. सहा महिन्यात ते एकाही बैठकीला आले नाहीत,कधीतरी बैठकीला हजर राहिले पाहिजे अशी नोंद करा असे संचालक शहाजी पवार म्हणाले. यावर नोंद करू का?, असे म्हणत सभापती नोंद करु का?,असे मिश्किलपणे म्हणाले.

सत्कार बाजार समितीचा अन् कर्मचाºयांचा..- तज्ज्ञ संचालक शहाजी पवार, प्रा. अशोक निंबर्गी  व श्रीमंत बंडगर यांचा बाजार समितीच्या वतीने सभागृहात सत्कार करण्यात आला. बैठक संपल्यानंतर सर्व संचालक निघून गेले. त्यानंतर कर्मचाºयांच्या वतीने तज्ज्ञ संचालकांचा सचिव मोहन निंबाळकर व अन्य अधिकारी व कर्मचाºयांच्या उपस्थितीत सत्कार करून फटाकेही उडविण्यात आले. 

टॅग्स :SolapurसोलापूरAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीMarketबाजारMarket Yardमार्केट यार्डFarmerशेतकरीagricultureशेती