सोलापूर बाजार समितीमधील हमीभाव केंद्रावर सव्वा कोटीच्या धान्याची विक्री, ५४ लाखांची रक्कम खात्यावर जमा करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 13:17 IST2018-01-15T13:14:42+5:302018-01-15T13:17:12+5:30
सोलापूर बाजार समितीत हमीभाव केंद्रावर सोयाबीन, उडीद व मूग या धान्यांची ५११ शेतकºयांनी २४.८ क्विंटल ५० किलो इतकी विक्री केली असून, याची किंमत एक कोटी २६ लाख ७१ हजार १०० रुपये इतकी आहे.

सोलापूर बाजार समितीमधील हमीभाव केंद्रावर सव्वा कोटीच्या धान्याची विक्री, ५४ लाखांची रक्कम खात्यावर जमा करणार
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १५ : सोलापूर बाजार समितीत हमीभाव केंद्रावर सोयाबीन, उडीद व मूग या धान्यांची ५११ शेतकºयांनी २४.८ क्विंटल ५० किलो इतकी विक्री केली असून, याची किंमत एक कोटी २६ लाख ७१ हजार १०० रुपये इतकी आहे.
नाफेडमार्फत २० नोव्हेंबर ते डिसेंबर अखेरपर्यंत हमीभाव केंद्रावर सोयाबीन, मूग व उडिदाची खरेदी झाली. उडीद ५ हजार ४०० रुपये, सोयाबीन ३ हजार ५० रुपये व मूग ५ हजार ५७५ रुपये क्विंटल दराने खरेदी केली आहे. उदिडाची ५२३, सोयाबीनची ५२ व मुगाची २७ शेतकºयांनी नोंद केली होती. यापैकी उडिदाची ४७८ शेतकºयांनी २२२९ क्विंटल ५० किलो, सोयाबीनची १४ शेतकºयांनी १४५ क्विंटल व मुगाची १९ शेतकºयांनी ३४ क्विंटलची विक्री केली आहे. उडिदाची एक कोटी २० लाख ३९ हजार ३०० रुपये, सोयाबीनची ४ लाख ४२ हजार २५० रुपये व मुगाची एक लाख ८९ हजार ५५० रुपये इतकी किंमत होते. एकूण ५११ शेतकºयांच्या मूग, उडीद व सोयाबीनची २४०८ क्विंटल ५० किलोची विक्री व त्याची किंमत एक कोटी २६ लाख ७१ हजार १०० रुपये इतकी झाली. यापैकी एक हजार शेतकºयांचे ५४ लाख रुपये शासनाकडून आले असून, ही रक्कम थेट शेतकºयांच्या खात्यावर जमा केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
-----------------
तुरीच्या खरेदीसाठी आॅनलाईन नोंदणी सुरू असून, शेतकºयांनी नोंदणी करावी. सातबारा उताºयावर नोंद असली तरच तुरीची खरेदी करता येणार आहे.
- सुरेश काकडे
प्रशासक सोलापूर बाजार समिती