Solapur: दोन वेळच्या कर्जमाफीनंतरही एकरकमी परतफेडकडे पाठ! सवलत वाढवून योजना सुरू ठेवण्याची मागणी
By दिपक दुपारगुडे | Updated: April 5, 2023 16:31 IST2023-04-05T16:30:55+5:302023-04-05T16:31:20+5:30
Solapur: सतत दोन वेळा झालेल्या कर्जमाफीनंतर थकबाकीत गेलेल्या शेतकऱ्यांसाठी डीसीसी बँकेने आणलेल्या ओटीएस (एकरकमी परतफेड) योजनेकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. आगाऊ सवलत देऊन योजना सुरू ठेवण्याची मागणी होत आहे.

Solapur: दोन वेळच्या कर्जमाफीनंतरही एकरकमी परतफेडकडे पाठ! सवलत वाढवून योजना सुरू ठेवण्याची मागणी
- दीपक दुपारगुडे
सोलापूर : सतत दोन वेळा झालेल्या कर्जमाफीनंतर थकबाकीत गेलेल्या शेतकऱ्यांसाठी डीसीसी बँकेने आणलेल्या ओटीएस (एकरकमी परतफेड) योजनेकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. आगाऊ सवलत देऊन योजना सुरू ठेवण्याची मागणी होत आहे.
राज्य शासनाकडून मागील पाच दोन वेळा शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना राबविण्यात आली. कर्ज काढून थकबाकीत जाणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना राबविता. मात्र, प्रामाणिकपणे नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करता अशी भावना निर्माण झाल्याने दोन वेळा कर्जमाफी झाल्यानंतर थकबाकीदारांची संख्या वाढत राहिली. थकबाकीदार शेतकऱ्यांचा आकडा वाढत चालल्याने डीसीसी बँकेने ओटीएस योजना आणली. ३० जून २०२० रोजीच्या थकीत अल्प, मध्यम व दीर्घ मुदत शेतीकर्जासाठी ओटीएस योजना राबविण्यात आली.
सप्टेंबरपासून मार्चपर्यंत ७ महिन्यात २८ हजार ३९ शेतकऱ्यांसाठी ओटीएस योजना राबवली. मात्र, शेतकऱ्यांकडून म्हणावा तितका प्रतिसाद मिळाला नसल्याचे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडील आकडेवारीवरून दिसत आहे. मार्चपर्यंत ३,६६२ शेतकऱ्यांनी ओटीएस योजनेसाठी अर्ज केले. त्यातील ३,४८९ प्रस्ताव मंजूर झाले. या पात्र मंजूर शेतकऱ्यांची रक्कम ८७ कोटी ३२ लाख रूपये इतकी आहे. आजही थकबाकीत गेलेल्या शेतकऱ्यांची संख्या २५ हजारांवर असल्याने सवलतीत वाढ करून योजनेला मुदतवाढ देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
२४ कोटी मिळाली सवलत
ओटीएस योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना व्याजात सवलत दिल्याने बँक व विकास सोसायटीने २४ कोटी ८ लाख रूपये सूट दिली आहे. यामुळे ३,४८९ थकबाकीत गेलेले शेतकरी कर्जमुक्त झाले असून, त्यांना नव्याने कर्जही मिळाले आहे.