शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

सोलापूरची आर्किटेक्चर पोरं लय भारीऽऽ चार महिने राबून केली प्रतिकृतींची तयारी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 15:17 IST

सोलापूर : आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांनी चार महिने परिश्रम घेऊन महापालिकेच्या इंद्रभुवन वास्तूसह अक्कलकोटचा राजवाडा, आयफेल टॉवर, लंडन ब्रीज, डिस्नेवर्ल्ड,  पिसाच्या ...

ठळक मुद्देविझोटेक इन्स्टिट्यूटतर्फे जगातील प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तूंच्या मॉडेलचे प्रदर्शनया प्रदर्शनाला शहरातील तंत्रनिकेतन व विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी भेट दिलीमहापालिकेची इंद्रभुवन, अक्कलकोटचा राजवाडा, आयफेल टॉवर, विजयपूरचा गोलघुमट आणि लंडन ब्रीजच्या प्रतिकृती विद्यार्थ्यांच्या आकर्षण ठरल्या. 

सोलापूर : आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांनी चार महिने परिश्रम घेऊन महापालिकेच्या इंद्रभुवन वास्तूसह अक्कलकोटचा राजवाडा, आयफेल टॉवर, लंडन ब्रीज, डिस्नेवर्ल्ड,  पिसाच्या झुकत्या मनोºयाबरोबरच दक्षिणात्य कलाकृतीतील म्हैसूर महाल, चारमिनार, गोलघुमट या ऐतिहासिक वास्तूंच्या प्रतिकृती साकारल्या आहेत. 

विझोटेक इन्स्टिट्यूटतर्फे जगातील प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तूंच्या मॉडेलचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. या प्रदर्शनात आर्किटेक्चर ड्राफ्टस्मन आणि एडवान्स इंटेरिअर डेकोरेशन अ‍ॅन्ड डिझायनिंगच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वास्तूंच्या प्रतिकृतींचा समावेश करण्यात आला होता.

प्रदर्शनाचे उद्घाटन माध्यमिक शिक्षण विस्तार अधिकारी अशोक भांजे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रदर्शनातील वास्तूंच्या प्रतिकृती अनुष्का जाजू, संपदा कनगिरी, सलोनी गरड, अश्विनी गरदास, संस्कृती देशमुख, पवन वाघचौरे, अरविंद करणकोट, मनीष हिरासकर, प्रणव मठपती, चेतन पवार, कौस्तुभ सोमशेट्टी, ऋतिक शिवशरण या पथकाने साकारल्या आहेत. या प्रदर्शनाला शहरातील तंत्रनिकेतन व विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी भेट दिली.

महापालिकेची इंद्रभुवन, अक्कलकोटचा राजवाडा, आयफेल टॉवर, विजयपूरचा गोलघुमट आणि लंडन ब्रीजच्या प्रतिकृती विद्यार्थ्यांच्या आकर्षण ठरल्या. 

‘इंद्रभुवन’चे आकर्षण...- सोलापुरात महापालिकेच्या इंद्रभुवन इमारतीचे सर्वांना आकर्षण आहे. त्यामुळे या इमारतीची प्रतिकृती तयार करण्यासाठी महापालिकेला भेट दिल्याचे अनुष्का जाजू हिने सांगितले. इमारतीची लांबी मोजून दर्शनी व डाव्या बाजूची पूर्ण प्रतिकृती तयार केली. इंद्रभुवनची लांबी ६९ तर रुंदी १२१ आणि उंची ७६ फूट इतकी आहे. यातील आयुक्त व इतर कार्यालयांचे मोजमाप घेऊन त्याप्रमाणे डिझाईन तयार केले. इमारतीवरील पावसाचे पाणी जाण्यासाठी असलेल्या मोºया व कमानीवर मूर्ती आहेत. याचे डिझाईन मात्र साकारता आलेले नाही. इंडोतिबेटिन वास्तूकलेचा हा नमुना भावी पिढीस माहिती असणे गरजेचे आहे. पोर्चसह साकारलेली ही प्रतिकृती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. 

विजयपूरचा गोलघुमटविजयपूरच्या गोलघुमटची प्रतिकृती साकारताना गुगलवरील माहितीचा वापर करण्यात आला आहे. इस्लामीक आर्टमधील पुरातन वास्तूरचनेचा हा नमुना आहे. डोम तयार करण्यासाठी फोमशीट आणि बाजूचे बुरुज साकारण्यासाठी आईस्क्रिमच्या फेकून दिलेल्या बांबूच्या काड्याचा चपखलपणे वापर करण्यात आला आहे.

अशा बनविल्या प्रतिकृती

  • - आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक वास्तू साकारताना इंद्रभुवन, अक्कलकोटचा राजवाडा, गोलघुमट, चारमिनार या वास्तूंना भेट दिली. त्यानंतर या इमारतीच्या हुबेहूब प्रतिकृती साकारण्यासाठी फोटो व मोजमाप घेतले.
  • - प्रतिकृती तयार करण्यासाठी फोमसीट, माऊंटबोर्ड, प्लास्टिक पाईप, ईअर स्टिक, इमारतीवरील नक्षीकामासाठी इमिटेशन ज्वेलरीचे साहित्य, गवताच्या काड्या, टिन्टेड शीट, अक्रॉलिक पेपरचा वापर करण्यात आला.गुगलवर प्रतिकृतींचे सुमारे २00 छायाचित्रे व मोजमाप तपासून एक सेंटीमीटरला ४८ फूट असे स्केल घेण्यात आल्याचे प्राचार्य नवनाथ निचरे यांनी सांगितले. 

अक्कलकोटचा राजवाडाअक्कलकोटचा राजवाडा काळ्या दगडात बांधलेला आहे. त्यामुळे यासाठी अक्रॉलिक पेपरचा वापर करून तिथे सध्या अस्तित्वात असलेल्या प्रत्येक गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती पवन वाघचवरे यांनी दिली. राजवाड्याची लांबी १४0 तर रुंदी ६0 फूट इतकी आहे. दर्शनी भागात असलेल्या खिडक्या व त्यावरील कमानीचे दर्शन होण्यासाठी कमी स्केलचा वापर केला. तळघरातील स्टोअररूम, त्यासमोर असलेला दगडांचा ढीग, वळणरस्ता अशा बारीक गोष्टींचा समावेश केला. वॉटर कलरच्या सहाय्याने रंगसंगती जुळविण्यात आली. 

टॅग्स :SolapurसोलापूरEducationशिक्षणSchoolशाळा