शहरं
Join us  
Trending Stories
1
विकणाऱ्याला अटक, मग विकत घेणाऱ्याला का नाही?, अंबादास दानवेंचा पार्थ पवारांना अडचणीत आणणारा सवाल
2
मदीनाहून १८० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या इंडिगो विमानाला बॉम्बची धमकी, अहमदाबादमध्ये आपत्कालीन लँडिंग
3
रशियातील सर्वात श्रीमंत महिला! मातृत्व रजेवर असताना सुचली कल्पना, आज अब्जावधींचं साम्राज्य
4
UPI कॅशबॅक : रोजच्या पेमेंटमधून पैसे वाचवण्याची 'स्मार्ट' ट्रिक! 'या' मार्गांनी करा अधिक कमाई
5
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, चांदी 2477 तर सोने 459 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या लेटेस्ट रेट
6
सरवणकरांची सून झाली तेजस्विनी लोणारी! शिवसेना युवा नेते समाधान सरवणकर यांच्यासोबत बांधली लग्नगाठ
7
Rinku Singh : टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेआधी विघ्न की, लग्न? रिंकू टीम इंडियातून आउट होण्यामागचं कारण काय?
8
Vladimir Putin India Visit : उशिरापर्यंत जागरण, दोन तास स्वीमिंग, दारूला स्पर्शही नाही; ७३ वर्षीय पुतिन यांची लाईफस्टाईल! लाल डायरीला खास महत्त्व
9
Mumbai: "हे आपलं घर..." मुलाचं आई- वडिलांना 'बिग सरप्राईज'; दारावर नावाची पाटी पाहून भावूक
10
'आम्हीदेखील देशाचे प्रतिनिधित्व करतो, पण..', पुतिन यांची भेट नाकारल्याने राहुल गांधी संतापले
11
"लोकशाहीचे वस्त्रहरण, १७ ईव्हीएम मशिनचे सील तोडून पुन्हा मतदान पण अद्याप गुन्हा दाखल नाही"
12
पाकिस्तानसाठी हेरगिरीचा आरोप, ब्रह्मोस माजी इंजिनियरची तब्बल सात वर्षानंतर निर्दोष मुक्तता
13
डिजिटल बँकिंगचे नवे नियम १ तारखेपासून लागू होणार; तुमच्यासाठी काय बदलणार, जाणून घ्या महत्त्वाची माहिती
14
पश्चिम बंगालमध्ये बाबरी बांधण्याची घोषणा केलेली; ममता बॅनर्जींनी आमदाराला पक्षातून निलंबित केले
15
थायलंड फिरायला गेले, पण मृत्यूनं गाठलं; दोन्ही मित्र स्विमिंग पूलमध्ये मृतावस्थेत! नेमकं काय झालं?
16
itel Rhythm Echo TWS Earbuds: बॅटरी लाईफही हवी, आजुबाजुचा गोंगाट घालविणारा इअरबड हवा, मग...;  हा बजेटमधील इअरबड कसा आहे...?
17
हायवेवरील ट्रकला कारने दिली जोरदार धडक; ४ डॉक्टरांचा जागीच मृत्यू, आई वडिलांचं स्वप्न भंगलं
18
'मागेल तेवढ्या पगाराची नोकरी', स्वतःच्या स्वप्नांसाठी दुसऱ्यांच्या स्वप्नाची राखरांगोळी 
19
एखाद्या ‘सुंदरी’चा फोटो तीन मिनिटांत करू शकतो तुमचे बँक खाते रिकामे, ऑनलाइन व्यवहार करताना सावध रहा
20
High Tide Mumbai: चार दिवस समुद्राला मोठी भरती; साडेचार मीटरपेक्षा अधिक उंच लाटा
Daily Top 2Weekly Top 5

Solapur: दुचाकीवरून जाताना हृदयविकारचा झटका आल्याने अक्कलकोटच्या शिक्षकाचा मृत्यू

By appasaheb.patil | Updated: May 8, 2024 17:13 IST

Solapur News: हंजगी (ता.अक्कलकोट) येथील जिवाजीराव शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वाल्मीकी बालक प्राथमिक आश्रम शाळा हंजगी येथील सहशिक्षक चनबसप्पा तुकशेट्टी (वय ४७) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.

- आप्पासाहेब पाटीलअक्कलकोट - हंजगी (ता.अक्कलकोट) येथील जिवाजीराव शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वाल्मीकी बालक प्राथमिक आश्रम शाळा हंजगी येथील सहशिक्षक चनबसप्पा तुकशेट्टी (वय ४७) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. मोटारसायकलवरून जाताना अचानक झटका आल्याने त्याचा दुदैवी मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे. ही घटना अक्कलकोट येथे बुधवारी सकाळच्या सुमारास घडली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चनबसप्पा तुकशेट्टी हे सकाळी घरी आंघोळ करुन समता नगर येथून अक्कलकोट शहरात जात असताना चालत्या मोटार सायकलवरच  तुकशेट्टी यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला. दरम्यान, चालत्या मोटारसायकलवरून ते खाली कोसळले. तेव्हा परिसरातील नागरिकांनी पाहून तात्काळ गाडीत घालून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर डॉक्टर यांनी तपासून मृत घोषित केले. त्यांच्या या दुर्दैवी मृत्यूमुळे किणी पंचक्रोशीती हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, तीन भाऊ असा परिवार आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरTeacherशिक्षक