सोलापूरात अपघात, दोघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 14:14 IST2017-08-19T14:12:48+5:302017-08-19T14:14:55+5:30

सोलापूरात अपघात, दोघांचा मृत्यू
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १९ : सोलापूर - हैद्राबाद रोडवरील मार्केट यार्ड चौकात रस्ता ओलांडताना कलप्पा विठोबा पगडे (वय ३०, रा़ केकडे नगर, मुळेगांव) यास मालट्रकने धडक दिल्याने जागीच मृत्यू झाला़ तर सोलापूर -पुणे महामार्गावरील राहोटी येथे सदाशिव किसन सिरसट (वय ६० रा़ सावळेश्वर ता़ मोहोळ) हे रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने धडक दिली़ या धडकेत सदाशिव हे गंभीर जखमी झाले होते़ उपचार सुरू असताना शासकीय रूग्णालयात त्यांचा मृत्यू झाला़