स्मृती उद्यानाजवळ लागली लढाई; एक नाग दोन मुंगसावर पडला भारी
By शीतलकुमार कांबळे | Updated: May 22, 2024 14:56 IST2024-05-22T14:56:13+5:302024-05-22T14:56:41+5:30
तिथे उपस्थित असलेल्या सर्वांनी व्हिडिओ काढत हा क्षण आपल्या कॅमेरात कैद केला.

स्मृती उद्यानाजवळ लागली लढाई; एक नाग दोन मुंगसावर पडला भारी
शितलकुमार कांबळे, सोलापूर : विजापूर रोड परिसरातील स्मृती उद्यान जवळ असलेल्या भंगार दुकानात एक नाग आणि दोन दिवसाची झुंज लागली. या झुंजीत नागाने दोन्ही मुंगूसाला पिटाळून लावले. तिथे उपस्थित असलेल्या सर्वांनी व्हिडिओ काढत हा क्षण आपल्या कॅमेरात कैद केला.
भंगार गोडाऊनमध्ये कर्मचारी काम करत असताना अचानक एक भलामोठा नाग त्या ठिकाणी आला. पाठोपाठच दोन मुंगुस नागावर तुटून पडले. तीन प्राण्यांची झुंज पाहून एकच धांदल उडाली. हा सर्व प्रकार तेथील कामगार सचिन डावरे यांनी आपल्या मोबाईल फोनमध्ये टिपला.संतोष पुजारी यांनी निसर्गप्रेमी सर्पमित्र संघटनेचे भीमसेन लोकरे यांना या घटनेची माहिती दिली. भीमसेन लोकरे, रवी स्वामी हे त्या ठिकाणी पोहचून पाहणी केली असता तेथील भंगाराच्या ढिगामध्ये तो नाग गेल्याचे समजले. नागाने पिटाळून लावल्याने दोन्ही मुंगुस हे गोडावून च्या बाहेर निघून गेल्याचे त्यांना सांगण्यात आले.
भीमसेन लोकरे व रवी स्वामी यांनी शोध घेऊन तेथे लपलेल्या अतिविषारी नागाला सुरक्षितरित्या पकडले. निसर्गाच्या सानिध्यात मुक्त केले.