शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

छोटे दागिने वितळवून मोठा दागिना बनवणार; पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचा प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2024 06:26 IST

२८ किलो सोने आणि ९५० किलो चांदी जमा

लोकमत न्यूज नेटवर्क, पंढरपूर : येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेला भाविकांकडून अर्पण केलेले लहान-मोठे दागिने वितळवून मोठा दागिना तयार करण्याचा प्रस्ताव मंदिर समितीच्या वतीने सरकारच्या विधि व न्याय विभागाकडे पाठविण्यात आल्याची माहिती सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडे छोटे-छोटे दागिने मिळून जवळपास २८ किलो सोने अन् ९५० किलो चांदी जमा झाली आहे. वर्षाकाठी विठ्ठलाच्या दर्शनाला एक कोटीहून अधिक भाविक येतात. अनेक भाविक श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेला छोटे-मोठे सोन्याचे व चांदीचे दागिने अर्पण करतात.

दागिने छोटे असल्यामुळे देवाला परिधान करता येत नाहीत. त्यामुळे त्याचा मोठा दागिना तयार करण्याची परवानगी मिळावी, यासाठी विधि व न्याय विभागाकडे प्रस्ताव पाठविला आहे. मात्र, अद्याप मंजुरी मिळाली नाही, असेही औसेकर यांनी सांगितले.

आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सोयीसाठी  विठ्ठल-रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन २ जूनपासून सुरू होणार आहे. यामुळे विठ्ठलाच्या पदस्पर्श व मुखदर्शन, अशा दोन रांगा राहणार आहेत. दर्शन रांगेत कोणताही बदल करण्यात आला नाही.- ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, सहअध्यक्ष, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती

टॅग्स :PandharpurपंढरपूरTempleमंदिरGoldसोनं