संथ गतीने सुरू असलेल्या संत विद्यापीठाचे काम जलद करू; शिक्षणमंत्री उदय सामंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2020 09:54 PM2020-12-21T21:54:47+5:302020-12-21T21:55:10+5:30

वारकरी परिषदचे संत साहित्य संमेलन; 

Slow | संथ गतीने सुरू असलेल्या संत विद्यापीठाचे काम जलद करू; शिक्षणमंत्री उदय सामंत

संथ गतीने सुरू असलेल्या संत विद्यापीठाचे काम जलद करू; शिक्षणमंत्री उदय सामंत

googlenewsNext

पंढरपूर : भारताला मोठा अध्यात्मिक वारसा आहे. हे तो वारसा पुढे जतन रहावा व पुढे चालवा यांसाठी संत विद्यापीठ महत्वाचे आहे. परंतू पंढरपुरातील संत विद्यापीठाचे काम संथ गतीने सुरू आहे ते जलद करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी वारकरी साहित्य परिषदेचे घेण्यात आलेल्या संत साहित्य परिषदेमध्ये दिली.

जुहू (मुंबई) येथील नोवाटेल हॉटेलमध्ये वारकरी साहित्य परिषदेचे नववे संत साहित्य संमेलनाला सुरुवात झाली. या संमेलना दरम्यान उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत बोलत होते. २१ आणि २२ डिसेंबर असे दोन दिवस चालणाऱ्या  स्वागताध्यक्षपदी पंढरपूरचे जिल्हा सत्र न्यायाधीश ह.भ.प. चकोर महाराज बाविस्कर यांनी भूषवलेली आहे.

पुढे सांमत म्हणाले, पंढरीचा वारकरी हा साऱ्या समाजाचा मार्गदाता आहे. आज या संत साहित्य संमेलनाचे उद्घाटन मी केली असली तरी मी एक सामान्य वारकरीच आहे. यापुढे वारकऱ्यांना फडकर यांना भेडसावणाऱ्या सर्व समस्या सोडवण्यासाठी सरकार दरबारी प्रयत्न करेल. तसेच पंढरपूरचे रखडलेले संत विद्यापीठ तात्काळ पूर्णत्वास नेण्यासाठी सरकारचा प्रतिनिधी म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करीन असे आश्वासन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले.


दिंडी काढून संमेलनाची सुरुवात

राज्याच्या कानाकोपऱ्यातून प्राथमिक स्वरूपात आलेल्या वारकरी दिंडी करी फडकरी मंडळाच्या प्रतिनिधींनी जुहू चौपाटीवर टाळमृदुंगाच्या गजरात हरिनामाचा जयघोष केला. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, पद्मविभूषण डॉक्टर डी वाय पाटील, साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, ह भ प माधव महाराज शिवणीकर, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, संत साहित्याचे अभ्यासक सदानंद मोरे, यांच्यासह वारकरी उपस्थित होते. यासर्वानी संत साहित्य संमेलनाची सुरुवात वारकरी परंपरेने दिंडी काढून झाली.

असा होता पहिला दिवस

नूतन अध्यक्ष ह.भ. प. चकोर महाराज बाविस्कर यांनी ह-भ-प अमृत महाराज जोशी यांच्याकडून अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. दुपारच्या पहिल्या सत्रामध्ये संप्रदायाच्या परंपरेची जोपासना या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी संत साहित्याचे अभ्यासक ह-भ-प डॉक्टर सदानंद मोरे होते यावेळी उपस्थित महाराज मंडळींनी या चर्चासत्रात सहभाग घेतला चार ते सहा या चर्चासत्रामध्ये प्रदूषण या विषयावर सखोल विश्लेषण करण्यात आले या चर्चासत्राचे अध्यक्ष ह.भ.प. माणिक गुट्टे तर वक्ते म्हणून ह-भ-प श्री भाटघरे, ह.भ.प श्री सोनटक्के यांनी सहभाग घेतला. सायंकाळी ६ ते ७ या वेळामध्ये सामुदायिक हरिपाठ घेण्यात आला. संध्याकाळी अभंग वाणी आणि कीर्तनाने आजच्या दिवसाची सांगता करण्यात आली.

Web Title: Slow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.