शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरात सहाव्यांदा ग्रीन कॉरिडॉर मोहीम यशस्वी, यकृताचे पुण्याला, डोळे सोलापूरच्या शासकीय रुग्णालयास दान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 12:33 IST

अवयवदान प्रक्रियेत पुणे, मुंबई, औरंगाबादनंतर जाणीव जागृतीमध्ये अग्रेसर ठरलेल्या सोलापूर शहरात सहाव्यांदा ग्रीन कॉरिडॉर मोहीम पार पडली.

ठळक मुद्देसोलापूरच्या यशोधरा रुग्णालयामध्ये उपचार घेत असताना ब्रेनडेड झालेल्या रुग्णाचे यकृत शस्त्रक्रियेद्वारे काढून ते पुण्यातील आदित्य बिर्ला रुग्णालयातील गरजू रुग्णाच्या शरीरात प्रत्यारोपण करण्यात डॉक्टरांना यश प्रकाश काशिनाथ भागवत (वय ५४, रा. शहापूर, जि. ठाणे) असे अवयवदान केलेल्या रुग्णाचे नाव आहेदान केलेले हे यकृत तीन तासात पुण्याच्या रुग्णालयात पोहोचवण्यात यश

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १४ : अवयवदान प्रक्रियेत पुणे, मुंबई, औरंगाबादनंतर जाणीव जागृतीमध्ये अग्रेसर ठरलेल्या सोलापूर शहरात सहाव्यांदा ग्रीन कॉरिडॉर मोहीम पार पडली. सोलापूरच्या यशोधरा रुग्णालयामध्ये उपचार घेत असताना ब्रेनडेड झालेल्या रुग्णाचे यकृत शस्त्रक्रियेद्वारे काढून ते पुण्यातील आदित्य बिर्ला रुग्णालयातील गरजू रुग्णाच्या शरीरात प्रत्यारोपण करण्यात डॉक्टरांना यश आले. शिवाय डोळे सोलापुरातील शासकीय रुग्णालयातील रुग्णासाठी सुपूर्द करण्यात आले. प्रकाश काशिनाथ भागवत (वय ५४, रा. शहापूर, जि. ठाणे) असे अवयवदान केलेल्या रुग्णाचे नाव आहे. सोलापुरात आय. आर. बी. कंपनीत नोकरीस असलेल्या प्रकाश भागवत यांना मेंदूच्या विकारामुळे झटके येत असल्याने यशोधरा हॉस्पिटलमध्ये रविवारी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्या मेंदूच्या निम्म्या भागास रक्तपुरवठा होत असल्याने डॉ. आशिष भुतडा यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर उपचार सुरू होते. सोमवारी सायंकाळी ६ वाजता त्यांची तपासणी करण्यात आली. तेव्हा त्यांचे ब्रेनडेड झाल्याचे निष्पन्न झाले. संबंधित रुग्णाचे साडू मुंबईच्या जे. जे. वैद्यकीय महाविद्यालयात कर्मचारी असल्यामुळे त्यांना अवयवदानाबद्दल कल्पना होती. त्यांनी रुग्णाच्या नातलगांना अवयवदानासाठी प्रवृत्त केले.यानंतर पुण्याच्या प्रादेशिक प्रत्यारोपण समन्वय समितीशी संपर्क साधून रुग्णाचे नातेवाईक अवयवदानास तयार असल्याचे कळवण्यात आले. त्यांचे यकृत (लिव्हर) प्रत्यारोपणास योग्य असल्याने पुण्यातील आदित्य बिर्ला हॉस्पिटलमधील एका गरजू रुग्णास हे यकृत बसवण्याचा निर्णय झाला. त्यानुसार पुढील हालचाली झाल्या. आदित्य बिर्ला हॉस्पिटलचे डॉ. जुनैद, डॉ. आशिष अंधारे, विनायक कदम हे डॉक्टरांचे पथक सोलापुरात आले. मंगळवारी सकाळी यशोधरा रुग्णालयात ब्रेनडेड रुग्णावर शस्त्रक्रिया करून त्यांचे यकृत काढले. दुपारी १२ वाजता ते पुण्याकडे रवाना झाले. ही प्रक्रिया रुग्णालयाचे चेअरमन डॉ. बसवराज कोलूर, डॉ. विजय शिवपूजे, डॉ. हेमंत देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. -----------------------यकृत तीन तासांत पुण्याला रवानाच्यशोधरा रुग्णालय सोलापूर ते आदित्य बिर्ला रुग्णालय पुणे हा तीन तास ग्रीन कॉरिडॉर करण्यात येऊन दान केलेले हे यकृत तीन तासात पुण्याच्या रुग्णालयात पोहोचवण्यात यश आले. अवयवदान प्रक्रियेच्या तांत्रिक व प्रशासकीय बाबींची पूर्तता करण्याकामी रुग्णालयाचे प्रशासन अधिकारी विजयचंद्रा त्यांचे सहकारी परेश मणलोर, सुकांत बेळे, धनंजय मुळे, दत्ता होसमनी आणि संपत हलकट्टी यांनी मोलाची भूमिका पार पाडली. अवयवदान करणाºया रुग्णांची स्थिती चांगली राखून अवयवदान यशस्वी करण्यास अतिदक्षता विभागाचे प्रमुख डॉ. शहेरोज बॉम्बेवाले, भूलतज्ज्ञ डॉ. राहुल स्वामी आणि शस्त्रक्रिया विभागातील अन्य कर्मचाºयांनी सहकार्य केले. -------------------------च्सोलापुरात यापूर्वी अश्विनी सहकारी रुग्णालय, अश्विनी ग्रामीण रुग्णालय कुंभारी येथून उस्मानाबादच्या शिवशंकर कोळी यांच्यासह अन्य दोघे, शासकीय रुग्णालयात बसवकल्याण येथील ओंकार अशोक महिंदरकर, यशोधरा हॉस्पिटलमध्ये सविता डिकरे, कालिका महामुनी, चंद्रकांत घोळसगावकर आणि आता प्रकाश भागवत अशी अवयवदान केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या माध्यमातून गरजू रुग्णांना अवयवदान प्रत्यारोपण करण्यात आले आहे. सोलापुरात अशी मोहीम सहाव्यांदा पार पडली. मंगळवारी ब्रेनडेड झाल्याने अवयवदान झालेल्या प्रकाश भागवत यांच्या यकृताशिवाय डोळे सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णासाठी दान करण्यात आले. 

टॅग्स :Solapurसोलापूरhospitalहॉस्पिटल