शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

उजनीवर शटडाऊन : सोमवारपासून पुन्हा पाच दिवसाआड पाणी, ३० वॉल्व्ह बदलणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 11:24 IST

 अमृत योजनेतून उजनी जलवाहिनीवरील वॉल्व्ह बदलण्यासाठी सोमवार, दि. १३ नोव्हेंबर रोजी ४८ तासांचा शटडाऊन घेण्यात येणार असल्याने आठवडाभर शहर व हद्दवाढ भागात चार व पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. 

ठळक मुद्देअमृत योजनेतून उजनी जलवाहिनीवरील १५० वॉल्व्ह व १0 एक्सपायशेन वॉल्व्ह बदलण्याचे काम मंजूर शहर व हद्दवाढ भागातील पाणीपुरवठा विस्कळीत होणार वॉल्व्ह बदलण्याच्या कामासाठी पाच पथके तयारआजपासून नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा.

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ११ :  अमृत योजनेतून उजनी जलवाहिनीवरील वॉल्व्ह बदलण्यासाठी सोमवार, दि. १३ नोव्हेंबर रोजी ४८ तासांचा शटडाऊन घेण्यात येणार असल्याने आठवडाभर शहर व हद्दवाढ भागात चार व पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. दीर्घकालीन पाणीपुरवठा सुधारणा करण्यासाठी अमृत योजनेतून उजनी जलवाहिनीवरील १५० वॉल्व्ह व १0 एक्सपायशेन वॉल्व्ह बदलण्याचे काम मंजूर झाले आहे. यातून १३७ वॉल्व्ह व ७ एक्सपायशेन वॉल्व्ह बदलण्याचे नियोजन आहे. २५ आॅक्टोबर रोजी या जलवाहिनीवरील वॉल्व्ह बदलण्यासाठी शटडाऊन घेण्यात आले होते. यात १३ वॉल्व्ह व एक एक्सपायशेन वॉल्व्ह बदलण्याचे काम झाले. त्यामुळे शहर व हद्दवाढ विभागाला दहा दिवस चार दिवसाआड पाणीपुरवठा झाला. आता दोन दिवसांत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. यामुळे २0 नोव्हेंबरपर्यंत शहर व हद्दवाढ भागातील पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे. वॉल्व्ह बदलण्याच्या कामासाठी पाच पथके तयार करण्यात आली आहेत. काम लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न राहणार आहे. पण बुधवारी वीज कंपनीने शटडाऊन घेतल्यास मात्र पाणीपुरवठ्यास विलंब होणार आहे. त्यामुळे आजपासून नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा.---------------------------असे होईल नियोजन१३ नोव्हेंबर रोजी सेटलमेंट, रामवाडी, भूषणनगर, धोंडिबावस्ती या भागाला शक्य झाल्यास १५ नोव्हेंबर रोजी रात्री किंवा १६ नोव्हेंबर रोजी सकाळी पाणी मिळेल. बाळे, सलगरवस्ती, देगाव, मरिआई चौक, अवंतीनगर परिसर, उत्तर कसबा, मुरारजीपेठ परिसर, इंदिरानगर, रामलिंग सोसायटी, भूषणनगर, गरिबी हटाव झोपडपट्टी नं. १ व २, यतिमखाना, शहानगर, ईरण्णावस्ती, आदित्यनगर, माशाळवस्ती, राजस्वनगर,गणेशनगर, नालंदानगर, शेटेवस्ती, गवळीवस्ती, आंबेडकरनगर, विद्यानगरी, साईधननगर या परिसराला पाच दिवसाआड तर उर्वरित शहराला चार दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे.

टॅग्स :Ujine Damउजनी धरण