शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘शिरापूर’चे पाणी एका दिवसातच झाले बंद; उत्तरमधील शेतकºयांचा संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 10:43 IST

उत्तर तालुक्यातील शेतकºयांचा संताप; माढा तालुक्यात अडविले पाणी

ठळक मुद्देशेतकºयांनी अचानक बंधाºयावर दारे टाकल्याने पाणी बंद झाले होतेबोगद्यातून बाहेर पडलेले पाणी माढा व मोहोळच्या शेतकºयांनी बंधाºयांची दारे टाकून अडविलेपोलिसांच्या मदतीने अधिकाºयांनी दारे काढल्याचे सांगण्यात आले

सोलापूर: कॅनॉलचा दर्जा असलेल्या शिरापूर बंधाºयापर्यंत पोहोचलेले पाणी एका दिवसातच बंद झाले. बोगद्यातून बाहेर पडलेले पाणी माढा व मोहोळच्या शेतकºयांनी बंधाºयांची दारे टाकून अडविले. दरम्यान, रविवारी पोलिसांच्या मदतीने अधिकाºयांनी दारे काढल्याचे सांगण्यात आले.

भीमा-सीना बोगद्यातून उजनीचे २ नोव्हेंबर रोजी सोडलेले पाणी गुरुवारी रात्री शिरापूर बंधाºयापर्यंत आले. शुक्रवारी दुपारी  बंधाºयावरील एक मोटार व सायंकाळपर्यंत ३ मोटारी सुरु करण्यात आल्या. दरम्यान, माढा व मोहोळच्या शेतकºयांनी बंधाºयाची दारे टाकली. 

एकीकडे माढा तालुक्यातील मोटारीने पाणी उपसा सुरू तर दुसरीकडे बंधाºयाची दारे टाकल्याने पाण्याचा प्रवाह शनिवारी पूर्णपणे थांबला. वरून पाणी बंद झाल्याची  बाब शिरापूरच्या पदाधिकाºयांपर्यंत पोहोचली. 

लागलीच शिरापूरच्या पदाधिकाºयांनी नदीवरील तीनही मोटारी शनिवारी बंद केल्या. त्यामुळे उत्तर सोलापूर तालुक्याला मिळणारे पाणी शनिवारी दुपारी बंद झाले. शिरापूर उपसा सिंचन योजनेचे पाणी बीबीदारफळच्या पुढे नान्नजहून वडाळ्याकडे जात असतानाच मागे मोटारी बंद झाल्या. जिल्ह्यात सर्वात कमी ४० मि.मी. पाऊस मार्डी मंडलात पडला असल्याने अत्यंत पाण्याची गरज आहे. असे असताना प्रशासन या भागाला पाणी देण्यासाठी प्रयत्न करत नाही. उलट मागील २०-२२ दिवसांपासून पाणी उपसा करणाºया माढा तालुक्यातील शेतकºयांनी वरती पाणी अडविले. 

कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी शिरापूर उपसा सिंचन योजनेसाठी ०.१५  टीएमसी पाण्याची तरतूद केली आहे.       तरतूद केल्याप्रमाणे पाणी मिळावे, अशी मागणी उत्तर तालुक्यातून होत आहे.

शेतकºयांनी अचानक बंधाºयावर दारे टाकल्याने पाणी बंद झाले होते. रविवारी आमच्या अधिकाºयांनी काही बंधाºयाची दारे काढल्याने पाणी शिरापूर बंधाºयाकडे येऊ लागले आहे. ठरल्याप्रमाणे उत्तर सोलापूर तालुक्याला पाणी मिळेल.- धीरज साळे, अधीक्षक अभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण

 पाण्याची सगळीकडूनच मागणी आहे. शिरापूर बंधाºयाच्या वरती पाणी अडविले होते. ते शिरापूर बंधाºयापर्यंत येत आहे. बंधाºयात आवश्यक तितके पाणी आल्यानंतर मोटारी सुरु करण्यात येतील.- जयंत शिंदे, अधीक्षक अभियंता, भीमा कालवा मंडळ

टॅग्स :SolapurसोलापूरWaterपाणीagricultureशेतीFarmerशेतकरीdroughtदुष्काळ