धक्कादायक; देवकार्याच्या जेवणास न आल्याने पंढरपुरात युवकाची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 12:09 IST2020-02-11T11:59:33+5:302020-02-11T12:09:28+5:30
पंढरपूर तालुक्यातील पळशी गावातील घटना; ग्रामपंचायत सदस्यासह चार जणांविरूध्द गुन्हा दाखल

धक्कादायक; देवकार्याच्या जेवणास न आल्याने पंढरपुरात युवकाची हत्या
पंढरपूर : घरी केलेल्या देवकार्याच्या जेवणास न आल्याचा राग मनात धरून युवकाची हत्या केल्याची घटना पळशी (ता. पंढरपूर) येथे घडली. याप्रकरणी पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. सोमनाथ राजाराम मोरे असे मयत युवकाचे नाव आहे.
याबाबत मयताचा चुलत भाऊ दत्तात्रय माणिक मोरे यांनी फिर्याद दिली. दिलेल्या फिर्यादीनुसार दिगंबर उत्तम वाघमारे, नारायण उत्तम वाघमारे, हरिदास उत्तम वाघमारे, श्रीधर माणिक वाघमारे, सचिन सदाशिव वाघमारे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. मयत सोमनाथला आरोपी मारहाण करीत असल्याचे पाहून घरातील महिलांनी सोमनाथला सोडविण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी महिलांना देखील मारहाण केल्याची माहिती पोलीसांनी दिली.