धक्कादायक! तरुणाने साडीनं घेतला गळफास, पोलिसांकडून तपास सुरू

By रवींद्र देशमुख | Updated: May 27, 2023 12:29 IST2023-05-27T12:29:04+5:302023-05-27T12:29:11+5:30

राहत्या घरात तरुणाने सिलिंग फॅनला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन तरुणाने आत्महत्या केली.

Shocking! The young man hanged himself in a sari. | धक्कादायक! तरुणाने साडीनं घेतला गळफास, पोलिसांकडून तपास सुरू

धक्कादायक! तरुणाने साडीनं घेतला गळफास, पोलिसांकडून तपास सुरू

सोलापूर : राहत्या घरात तरुणाने सिलिंग फॅनला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन तरुणाने आत्महत्या केली. संदीप शांतमलप्पा इंगळे (वय ३०, रा. होटगी स्टेशन, दक्षिण सोलापूर ) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी उघडकीस आली.

मृत संदीप याने राहत्या घरातील सिलिंग फॅनला शुक्रवारी दुपारच्या सुमारास गळफास घेतले. ही घटना दुपारी त्यांच्या कुटुंबियांना लक्षात आल्यानंतर त्याच्या गळ्या भोवतालचा फास काढून त्याला खाली उतरवून उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे. त्याने का आत्महत्या केली याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

Web Title: Shocking! The young man hanged himself in a sari.