धक्कादायक! प्रेमयुगलांनी एकाच झाडाला गळफास घेऊन संपवलं जीवन
By रूपेश हेळवे | Updated: February 25, 2023 13:41 IST2023-02-25T13:41:18+5:302023-02-25T13:41:54+5:30
Solapur: उत्तर सोलापूरमधील कवठे गावात एका झाडाला प्रेमी युगलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

धक्कादायक! प्रेमयुगलांनी एकाच झाडाला गळफास घेऊन संपवलं जीवन
- रूपेश हेळवे
सोलापूर : उत्तर सोलापूरमधील कवठे गावात एका झाडाला प्रेमी युगलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. त्यांना खाली सध्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.
कवठे शिवारातील एका लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या आवस्थेत हे जोडपे आढळले. ही घटना तेथील नागरिकांना कळताच त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, त्यांच्या नातेवाईकांशी पोलिस संपर्कसाधत आहेत.